प्रियकराला जाळण्याचा प्रयत्न, संशयितांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 11:02 PM2022-02-12T23:02:32+5:302022-02-12T23:03:17+5:30

देवळा/लोहोणेर : लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११) प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना शनिवारी (दि.१२) कळवण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेने लोहोणेर गाव हादरले असून, गावात शांतता पसरली आहे.

Attempt to burn lover, police custody of suspects | प्रियकराला जाळण्याचा प्रयत्न, संशयितांना पोलीस कोठडी

प्रियकराला जाळण्याचा प्रयत्न, संशयितांना पोलीस कोठडी

googlenewsNext
ठळक मुद्देलोहोणेरमध्ये सन्नाटा : पोलिसांकडून तपास सुरू

देवळा/लोहोणेर : लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११) प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना शनिवारी (दि.१२) कळवण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेने लोहोणेर गाव हादरले असून, गावात शांतता पसरली आहे.

शुक्रवारी रावळगाव येथील युवतीने तिच्या कुटुंबीयांसह लोहोणेर येथे येऊन आपला प्रियकर गोरख बच्छाव याच्याशी वाद घालत, त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे हिच्यासह गोकुळ तोंगल सोनवणे, निर्मला गोकुळ सोनवणे, तसेच तिचे दोन्ही भाऊ हेमंत गोकुळ सोनवणे व प्रसाद गोकुळ सोनवणे (सर्व रा.बी. सेक्शन, रावळगाव) यांना ताब्यात घेतले होते. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षांपूर्वी रावळगाव ता.मालेगाव येथील सदर युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. मात्र, युवतीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते. सदर विवाह मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय मुलीच्या घरच्यांना आला. त्यामुळे मुलीसह तिचे कुटुंबीय लोहोणेर येथे आले. यावेळी गोरख याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून, मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले, यात तो गंभीर जखमी झाला होता. घटना घडल्यानंतर संबंधित युवती व तिचे कुटुंबीय स्वतः पोलिसांत हजर झाले होते. त्यानंतर, देवळा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. शनिवारी (दि.१२) त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

युवकाची प्रकृती स्थिर
या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. शनिवारी लोहोणेर गावातही सन्नाटा पसरलेला होता. गोरख बच्छाव हा ५५ टक्के भाजला असून, त्याच्यावर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. पोलीसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

Web Title: Attempt to burn lover, police custody of suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.