‘मिशन आॅल आउट’मध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:48 AM2019-12-13T01:48:28+5:302019-12-13T01:49:40+5:30

शहर मागील काही दिवसांपासून जबरी लूट, मोठ्या घरफोड्या, हाणामाऱ्यांसह खुनांच्या घटनांनी हादरले आहे. वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी (दि.११) दिवस-रात्रपाळीचे पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत तत्काळ ‘मिशन आॅल आउट’ राबविण्याचे आदेश दिले. एकीकडे ही विशेष मोहीम सुरू असताना मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी जुने नाशिकमधील एका खासगी बॅँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला.

Attempts to break into an ATM in 'Mission All Out' | ‘मिशन आॅल आउट’मध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

‘मिशन आॅल आउट’मध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देपोलिसांना आव्हान : एटीएमबाहेर ‘क्यूआर कोड’ तरीही चोरट्यांचे धाडस

नाशिक : शहर मागील काही दिवसांपासून जबरी लूट, मोठ्या घरफोड्या, हाणामाऱ्यांसह खुनांच्या घटनांनी हादरले आहे. वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी (दि.११) दिवस-रात्रपाळीचे पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत तत्काळ ‘मिशन आॅल आउट’ राबविण्याचे आदेश दिले. एकीकडे ही विशेष मोहीम सुरू असताना मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी जुने नाशिकमधील एका खासगी बॅँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला.
शहर व परिसरात जबरी लुटीच्या घटनांसह घरफोड्यांच्या घटनांची जणू मालिकाच सुरू झाली की काय? अशी शंका नाशिककरांना आल्यास पोलीस प्रशासनाला त्याचे नवल वाटू नये, कारण सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. गंगापूररोडवरील ‘इलिमेन्ट’ शोरूम एक दोन नव्हे तर तब्बल पाच चोरट्यांच्या टोळीने फोडून अवघ्या २५ मिनिटांत पाऊण कोटी रुपयांचा ऐवज लांबविला. या ११ दिवसांत शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल १७ घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे १ कोटी रुपयांचा ऐवज लांबविला आहे. बुधवारी घडलेल्या शोरूमच्या चोरीमध्ये सुमारे पाउण कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेला. बुधवारच्या आठवडे बाजारात महिलांच्या गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रदेखील हिसकावल्याची घटना घडली.
‘आॅल आउट’मध्ये ५०० पोलीस रस्त्यावर
आॅल आउट मोहिमेत चार उपआयुक्त, सात सहायक आयुक्त, १५ निरीक्षक, ५० सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, ४३४ पोलीस कर्मचारी, ४४ होमगार्ड, असा पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरलेला होता. तरीदेखील चोरट्यांनी एटीएमवर डल्ला मारण्याचा प्रयत्न भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत केला हे विशेष !
‘आॅल आउट’ मोहीम संपताच चोरटे सक्रिय
वाढती गुन्हेगारीला अंकुश लावण्यासाठी नांगरे-पाटलांनी ‘मिशन आॅल आउट’ मोहीम राबविली. मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही मोहीम आयुक्तालय हद्दीत सुरू होती; मात्र मोहीम आटोपून अवघे काही तास होत नाही, तोच जुने नाशिकमधील चौकमंडई येथील गस्तीवरील पोलिसांचे ‘क्यूआर कोड’ लावेलेले अ‍ॅक्सिस बॅँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून केला गेला. या प्रयत्नात चोरट्यांना यश आले नाही, त्यामुळे एटीएम फोडीचा गुन्हा टळला, अन्यथा गुन्ह्यांमध्ये भरीस भर पडली असती. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा अज्ञात चोरट्यांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempts to break into an ATM in 'Mission All Out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.