सटाण्याला एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:38 PM2018-11-21T16:38:12+5:302018-11-21T16:38:40+5:30

पहाटेची घटना : ३६ लाखांची रोकड वाचली

Attempts at breaking the ATM to the ATTM are unsuccessful | सटाण्याला एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

सटाण्याला एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

Next
ठळक मुद्देबुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये घुसून सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमे-याचे कनेक्शन कापून टाकले.

सटाणा : शहरातील पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले एसबीआयचे एटीएम बुधवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न फसल्याने सुमारे ३६ लाख रुपयांची लूट टळली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सदर प्रकार पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
शहरातील नामपूर रस्त्यावरील वन विभागाच्या वसाहती समोरील एसबीआयच्या एटीएम मध्ये मंगळवारी (दि.२०) दुपारी एका मशीन मध्ये ३० लाख ९ हजार ८०० तर व दुसऱ्या मशीनमध्ये ५ लाख ९१ हजार ९०० रु पयांची रोकड टाकण्यात आली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये घुसून सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमे-याचे कनेक्शन कापून टाकले. त्यानंतर कटरने मशीन फोडण्याचा प्रयत्न करत असतांना गस्तीवर असलेल्या पोलीस व्हॅनचा सायरन वाजल्याने त्यांनी पोबारा केला. वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी परिसरात गस्त घालत असल्यामुळे ते पहाटे साडेचार वाजता हजेरी पुस्तकावर नोंद करण्यासाठी एटीएममध्ये गेले होते. तेव्हा हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तत्काळ श्वानपथकला पाचारण केले. स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार नामदेव खैरनार, पवार आणि बहिरम यांनी जाऊन घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी रोकड लुटण्यासाठी वाहनाचा वापर केला असावा असे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempts at breaking the ATM to the ATTM are unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.