शिक्षकाचा विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:06 AM2018-09-06T00:06:05+5:302018-09-06T00:06:31+5:30

सटाणा : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गुणगौरव होत असताना, दुसरीकडे मात्र एका शिक्षकाने या पेशालाच काळिमा फासण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंतापूर येथे घडली. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला एका शिक्षकाने विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

Attempts to flee the teacher's student are unsuccessful | शिक्षकाचा विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न फसला

शिक्षकाचा विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न फसला

Next
ठळक मुद्देतीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

सटाणा : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गुणगौरव होत असताना, दुसरीकडे मात्र एका शिक्षकाने या पेशालाच काळिमा फासण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंतापूर येथे घडली. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला एका शिक्षकाने विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.
दगडपाडा जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक सुनील शांताराम अहिरे (४४) याने गावातीलच एका विद्यार्थिनीच्या अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन संबंध प्रस्थापित केले. मंगळवारी (दि.४) सुनीलने फूस लावून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या नातेवाइकांना मुलगी घरी नसल्याचे समजताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी तापसाचे चक्र शीघ्रगतीने फिरवून शिक्षक सुनील याला मुलीला पळवून नेताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्या विरु द्ध पॉस्को कायद्यांतर्गत करवाई करण्यात आली. दरम्यान, बुधवारी (दि.५) सटाणा न्यायालयपुढे उभे केले असता न्यायालयाने शिक्षक सुनील यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Attempts to flee the teacher's student are unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.