सटाण्यात तहसीलदारासाठी मनसेचा ठिय्या टाळे ठोकण्याचा प्रयत्न : प्रांतांकडून महिनाभरात नेमणुकीचे लेखी आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:11 AM2018-04-11T00:11:00+5:302018-04-11T00:11:00+5:30

सटाणा : बागलाणसाठी कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक करण्याची मागणी करूनही दखल न घेतली गेल्याने संतप्त झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.

Attempts to halt the MNS's status for Tehsildar in Satna: Written assurances from the provinces for a month | सटाण्यात तहसीलदारासाठी मनसेचा ठिय्या टाळे ठोकण्याचा प्रयत्न : प्रांतांकडून महिनाभरात नेमणुकीचे लेखी आश्वासन

सटाण्यात तहसीलदारासाठी मनसेचा ठिय्या टाळे ठोकण्याचा प्रयत्न : प्रांतांकडून महिनाभरात नेमणुकीचे लेखी आश्वासन

Next
ठळक मुद्दे तहसीलदारांच्या दालनासमोर दोन तास ठिय्या आंदोलनमहिनाभरात कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक करण्याचे तोंडी आश्वासन

सटाणा : बागलाणसाठी कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक करण्याची मागणी करूनही दखल न घेतली गेल्याने संतप्त झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुलूप लावण्यापासून रोखले; मात्र तरीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदारांच्या दालनासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. आमदार आणि तहसीलदार यांच्यात झालेल्या संघर्षामुळे बागलाण तालुक्याला पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याचा आरोप करत दोघांच्या वादविवादामुळे हजारो बागलाणवासीयांची शासकीय कामे रखडली असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे यांनी सांगितले. अखेर मनसेची मागणी उद्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या महसूलमंत्र्यांच्या कानावर टाकून कायमस्वरूपी तहसीलदार नेमणुकीसाठी पत्रव्यवहार करण्याचे तोंडी आश्वासन प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी आंदोलकांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. मनसैनिकांना प्रांत प्रवीण महाजन यांनी तुमची मागणी त्वरित शासनाकडे पाठवीत असून, महिनाभरात कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक करण्याचे तोंडी आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेतले.

Web Title: Attempts to halt the MNS's status for Tehsildar in Satna: Written assurances from the provinces for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.