आराईगाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 09:17 PM2021-04-29T21:17:38+5:302021-04-30T00:42:23+5:30
जुनी शेमळी : ग्रामपंचायत प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी लसिकरणासाठी नागरिकांची हेळसांड होऊ नये यासाठी गावातच लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले तसा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आला व त्यास यश आले. त्यामुळे गावातच नागरीकांकरीता लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जुनी शेमळी : ग्रामपंचायत प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी लसिकरणासाठी नागरिकांची हेळसांड होऊ नये यासाठी गावातच लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले तसा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आला व त्यास यश आले. त्यामुळे गावातच नागरीकांकरीता लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला हा कोरोना आता शहरापाठोपाठ खेड्यांकडेही तितक्याच तीव्रतेने पसरत आहे. प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत आहे. परंतु गावात गेल्या महिना दीड महिन्यापासून कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी विविध प्रकारच्या फवारण्या करण्यात आल्या. शेवटी जनता कर्फ्यु लावण्यात येऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सलग पाच दिवस गाव कडक बंद ठेवण्यात आले. कुणीही घराबाहेर अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडत नव्हते. आता ग्रामपंचायत प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून गावातच लसीकरण मोहीम सुरु केली.
ग्रामपंचायत सरपंच मनीषा आहिरे, उपसरपंच अनिल माळी, सदस्य माधव आहिरे, डॉ. गोकुळ आहिरे यांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, ब्राम्हणगाव आरोग्य केंद्राचे डॉ. कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरणासाठी ३०० ते ४०० लसीचे डोस उपलब्ध करून दिले.
आरोग्य विभागाकडून बुधवारी (दि.२८) एकाच दिवसात सुमारे ४०० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात येईल असे नियोजन केले. तसेच ज्या व्यक्तीना काही लक्षणे असतील अशा ग्रामस्थांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यावेळी लसीकरणाचा ग्रामस्थांनी चांगला लाभ घेतला.
नागरिकांना उन्हामुळे त्रास होऊ नये यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली व सोशल डिस्टंसिंगचे पालन करत सर्वांचे लसीकरण व रॅपीड टेस्ट करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती साधना आहिरे, दिलीप आहिरे, माजी उपसभापती परशुराम आहिरे,अश्विन आहिरे आदी उपस्थित होते. तर लसिकरणासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक, ग्रामविकास अधिकारी सुभाष भामरे ग्रामपंचायत लिपिक स्वप्निल आहिरे, राहुल पानपाटील, शिपाई दिनेश गायकवाड, भाऊसाहेब आहिरे, वसंत भदाने, गौतम गरुड, भारत अहिरे, आरोग्य कर्मचारी डॉ.अलिना सय्यद, सचिन भदाने, एन. एम. पवार, प्रतिभा खैरनार, मनिषा गोसावी, सारिका बच्छाव, सुशिला मल्ले आदींनी परिश्रम घेतले.
लसीकरणावेळी गट विकास अधिकारी हेमंत काथेपुरी यांनी भेट देवून समाधान व्यक्त केले.
आजची परिस्थिती पाहता सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत असल्याने व त्यांची होणारी पिळवणूक थांबावी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. पुढील काळात देखील असेच यशस्वी लसीकरण मोहिम राबवून गावातून कोरोनाचा समूळ नायनाट करणार आहोत.
- मनिषा अहिरे, लोकनियुक्त सरपंच.