संस्कृत भाषेच्या गतवैभवासाठी प्रयत्न

By admin | Published: January 12, 2015 12:34 AM2015-01-12T00:34:54+5:302015-01-12T00:35:17+5:30

नंदकुमार : संस्कृत संमेलन उत्साहात

Attempts for the loss of Sanskrit language | संस्कृत भाषेच्या गतवैभवासाठी प्रयत्न

संस्कृत भाषेच्या गतवैभवासाठी प्रयत्न

Next

नाशिक : संस्कृत भाषा ही केवळ प्राचीन भाषा नाही, तर ज्ञानाचे भांडार आहे़ आपल्या ऋषी-मुणींनी याच भाषेत ज्ञान भांडार साठविले आहे़ तिला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी तिला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ़ नंदकुमार यांनी व्यक्त केले़
दादासाहेब गायकवाड सभागृह येथे संस्कृत भारतीच्या वतीने आयोजित संस्कृत संमेलनात ते बोलत होते़ संमेलनाध्यक्ष तथा, अखिल भारतीय संस्कृत भारतीचे महामंत्री डॉ़ नंदकुमार, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ अरुण जामकर, स्वागताध्यक्ष दिनकर पाटील व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले़
डॉ़ नंदकुमार म्हणाले, सर्व भाषांची जननी असे संस्कृ तला म्हटले जाते़ असा कोणता विषय नाही ज्याबद्दल संस्कृतमध्ये लिहिले गेले नाही़ प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी संस्कृत अनिवार्य आहे़ आज इतर देशांतील विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करत आहेत, तर आपले विद्यार्थी दुर्लक्ष करतात हे दुर्दैव आहे़
डॉ़ जामकर म्हणाले, संस्कृत ही विज्ञानाचे मोठे भांडार आहे़ याचबरोबर संस्कृत ही भारतीय जीवनाचे दर्शन घडविणारी भाषा असल्याने तिला उर्जितावस्था आणणे आवश्यक आहे़ विज्ञान विद्यापीठांच्या विद्यालयांमध्ये संस्कृत वर्ग सुरू करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला़
संमेलनाच्या उद्घाटन प्रारंभी हरेकृष्ण मंदिर येथून गं्रथ दिंडी व शोभायात्रा काढण्यात आली़ यामध्ये संस्कृत भारतीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता़ उद्घाटनानंतर झालेल्या व्याख्यानात प्रा़अनिता जोशी, वैशाली वैद्य, वसंत मगदुम, डॉ़ एकनाथ कुलकर्णी, डॉ़ आश्लेषा कुलकर्णी, डॉ़ लीना हुन्नरीगीकर, डॉ़ गजानन आंभोरे यांची व्याख्याने झाली़ यामध्ये त्यांनी संस्कृत भाषा व वेदकर्मकांड, प्राचीन हस्तलिखिते, योग, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, आयुर्वेद, अर्थशास्त्र, इतिहास, अध्यात्मशास्त्र याबाबत चर्चा झाली़ दुपारच्या सत्रात संस्कृत क्रीडा व प्रतिभादर्शन कार्यक्रम होऊन संमेलनाचा समारोप झाला़
याप्रसंगी रामकृष्ण महाराज लहवीतकर, महंत भीष्माचार्य, रामचंद्र पेनोरे, सतीश शुक्ल, उद्योजक धनंजय बेळे, डॉ़ एकनाथ कुलकर्णी, दत्तात्रय शिंदे, सोपान सोनवणे, प्ऱ ल़ नगरे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Attempts for the loss of Sanskrit language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.