भारतीय शिक्षणपद्धती पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:49 AM2019-07-21T01:49:54+5:302019-07-21T01:50:25+5:30
देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटूनही आजही याशिक्षण पद्धतीवर मॅकेलेचा आणि इंग्रजांचा प्रभाव दिसून येतो. मात्र भारतीय समाज, भाषा, वैचारिकता, कृषी पद्धती आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव शिक्षण व्यवस्थेत प्रतिबिंबित होत नसल्याची खंत व्यक्त करतानाच आपल्याला आॅक्सफर्ड, इंटरनशनल स्कूल महत्त्वाच्या की भारतीय गुरुकुलपद्धती गरजेची आहे. यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाल्यानेच भारतीय शिक्षण पद्धती पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे सदस्य डॉ. टी. व्ही. कट्टीमनी यांनी केले.
नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटूनही आजही याशिक्षण पद्धतीवर मॅकेलेचा आणि इंग्रजांचा प्रभाव दिसून येतो. मात्र भारतीय समाज, भाषा, वैचारिकता, कृषी पद्धती आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव शिक्षण व्यवस्थेत प्रतिबिंबित होत नसल्याची खंत व्यक्त करतानाच आपल्याला आॅक्सफर्ड, इंटरनशनल स्कूल महत्त्वाच्या की भारतीय गुरुकुलपद्धती गरजेची आहे. यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाल्यानेच भारतीय शिक्षण पद्धती पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे सदस्य डॉ. टी. व्ही. कट्टीमनी यांनी केले.
रावसाहेब थोरात सभागृहात भारतीय शिक्षण मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शाखेतर्फे ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, प्राचार्य अस्मिता वैद्य, आश्विनीकुमार भारद्वाज आदी उपस्थित होते. त्याचपद्धतीचे बदल शालेय तसेच उच्च शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच यावेळी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारतीय शिक्षण पद्धतीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे स्थान निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रूपाली जोडगेकर यांनी सूत्रसंचालक केले. विजय अवस्थी यांनी आभार मानले.
विद्यार्थी केंद्रीय पद्धत
कुलगुरू टी. व्ही. कट्टीमनी म्हणाले, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीयता, भारतीय जीवन, भारतीय संस्कृती यावर आधारित शिक्षण प्रणाली असणार आहे. भारतीय परंपरेतील बाबी पाठ्यपुस्तकात आल्या नसल्याने, भारतीय परंपरेचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले नाही. शिवाय विद्यार्थी केंद्र्रित शिक्षणपद्धतीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारताची समाजव्यवस्था, परंपरा आणि संस्कृती यावर भर आहे.
भारतीय परंपरेचे ज्ञान नाही
कुलगुरू टी. व्ही. कट्टीमनी म्हणाले, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीयता, भारतीय जीवन, भारतीय संस्कृती यावर आधारित शिक्षण प्रणाली असणार आहे. भारतीय परंपरेतील बाबी पाठ्यपुस्तकात आल्या नसल्याने, भारतीय परंपरेचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले नाही. शिवाय विद्यार्थी केंद्र्रित शिक्षणपद्धतीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारताची समाजव्यवस्था, परंपरा आणि संस्कृती यावर भर आहे.