शहा वीज केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:08+5:302021-03-21T04:15:08+5:30
सिन्नर, कोपरगाव तालुक्याची वीज समस्या दूर होणार सिन्नर : सिन्नर व कोपरगाव ची वीज समस्या दूर करण्यासाठी शहा येथील ...
सिन्नर, कोपरगाव तालुक्याची वीज समस्या दूर होणार
सिन्नर : सिन्नर व कोपरगाव ची वीज समस्या दूर करण्यासाठी शहा येथील १३२ केव्ही वीज केंद्राच्या कामाला गती द्या, सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासह कोपरगाव च्या पश्चिम पट्ट्यातील वीज प्रश्नावर महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शहा वीज केंद्रातच्या कामाला गती देऊन तीन ते चार महिन्यात हे काम पूर्ण करा, अशा सूचना वीज वितरण अधिकाऱ्यांना दिल्या.
शहा येथील प्रगतिपथावर असलेल्या १३२ केव्ही वीज केंद्राच्या कामाची आमदार माणिकराव कोकाटे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी संयुक्तरीत्या पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले, या भागात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा जाणवतो प्रत्यक्षात आठ तास लोड शेडींग असताना नेहमी कमी दाबाने आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना चार ते पाच तास देखील पुरेशी वीज मिळत नाही. त्यामुळे माजी आमदार अशोकराव काळे आणि मी दोघांनी मिळून कोळपेवाडी येथे १३२ के व्ही वीज केंद्र मंजूर करून आणले मात्र भाजपच्या सत्ताकाळात हे काम सुरू झाले नाही. त्यानंतर शहा येथे सदर १३२ के व्ही वीज केंद्राची उभारणी करण्याचे ठरले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली. सद्या या वीजकेंद्रा चे काम अत्यंत वेगाने सुरू असून विजेच्या टॉवर उभारणीसाठी येत असलेल्या अडचणींबाबत शेतकर्यांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्यात येईल. कामाबाबत अधिकार्यांशी चर्चा झाली असून येत्या तीन ते चार महिन्यात वीज केंद्राचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे या केंद्राअंतर्गत सिन्नर तालुक्यातील चार वीज उपकेंद्र आणि कोपरगाव तालुक्यातील चार विज उपकेंद्रांची जोडणी करण्यात येणार असून दोन्ही तालुक्यातील वीज प्रश्न मार्गी लागणार आहे.
------------------
सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के व्ही वीज केंद्राच्या कामाची पाहणी करतांना आमदार माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे, वीज वितरणचे अधिकारी व शेतकरी. (२० सिन्नर मिटींग)