उपस्थिती शंभर टक्के; मात्र उपाययोजनांचे तंतोतंत पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:29+5:302021-03-25T04:15:29+5:30
-------- सातपूरला वसुलीसाठी शंभर टक्के उपस्थिती महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थितीत कामकाज सुरु आहे. मार्च अखेरची थकबाकी ...
--------
सातपूरला वसुलीसाठी शंभर टक्के उपस्थिती
महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थितीत कामकाज सुरु आहे. मार्च अखेरची थकबाकी वसुलीसाठी धावपळ सुरु असून, मनपा आयुक्तांनी दिलेले वसुलीचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचारी प्रयत्नशील आहेत. मात्र हे करत असताना कर्मचारी कोरोनाचे सर्व निदेर्शाचे काटेकोर पालन करीत आहेत.वसुलीसाठी घरोघरी जात आहेत. तर आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझरचा स्टँड ठेवण्यात आला आहे.कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मास्क सक्तीचा करण्यात आला आहे.
----------
एमआयडीसीत अत्यावश्यक कामासाठी प्रवेश
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी कार्यालयात देखील शंभर टक्के कर्मचारी कार्यालयीन कामकाजात व्यस्त आहेत. अति महत्वाचे आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना भेटणे गरजेचे आहे. अशाच लोकांना कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. मार्च अखेरच्या कामांची व्यस्तता असल्याने कोरोनाचा कोणताही प्रभाव जाणवत नसल्याचे या ठिकाणी दिसून आले.
---------------
उपकार्यालयात खबरदारी
इंदिरानगर महापालिकेच्या उपकार्यालयात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. या उपकायालात घरपट्टी व पाणीपट्टी देयक स्विकारले जातात तसेच परिसरात त्याचे वाटप करण्यात येते. पाच कर्मचारी असून यापैकी एक जण घरपट्टी व पाणीपट्टी स्वीकारण्यासाठी बसतात तर बाकी चार जण मार्च एण्ड असल्याने परिसरातील घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांकडे जाऊन वसुली करीत आहेत. कार्यालयात गर्दी होणार नाही यासाठी प्लायवूडचे पार्टिशन टाकून तीन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत.
-----------------------
आरटीओ कार्यालयात मास्क बंधनकारक
पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांसंबंधी कामे करण्यासाठी येणाºया नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर कर्मचाऱ्यांचे प्रवेशद्वारावर तापमान व ऑक्सिजन तपासणी करण्यात येत आहे. प्रत्यक्ष कार्यालयात बसतांना सुरक्षित अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना घेण्यासाठी येणाºया अर्जदारांना चाचणी केंद्रावर येतांना हातमोजे, मास्क व सॅनिटायझर्सचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. संगणकीय चाचणी घेतांना की बोर्ड सॅनिटायझर्स केला जातो. शासन आदेशानुसार ५० टक्के कर्मचारी उपस्थीत आहेत.
---------------------
पंचवटी कार्यालयात सुरक्षित अंतर
मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर्स बसविण्यात आले आहे. तसेच कार्यालयात येतांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असून, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव नोंदणी पत्ता, फोन क्रमांक सुरक्षारक्षक नोंदवून घेत आहेत. पंचवटी विभागीय कार्यालयात कर्मचारी संख्या कमी असल्याने सर्व कार्यालयात विविध कामासाठी येणाºया नागरिकांना सुरक्षित अंतर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
--------------------------