शांतता समितीच्या बैठकीला प्रथमच अपर महासंचालकांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 10:40 PM2019-08-09T22:40:30+5:302019-08-10T00:20:10+5:30
आसपास कसेही प्रसंग घडले तरी शहराची शांतता कायम राखण्यात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे. तसेच आगामी सण-उत्सवांच्या दृष्टीने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यात पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी केले. भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीस प्रथमच अपर पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित राहिल्याने या बाबीचेच नागरिकांना विशेष कौतुक वाटले.
नाशिक : आसपास कसेही प्रसंग घडले तरी शहराची शांतता कायम राखण्यात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे. तसेच आगामी सण-उत्सवांच्या दृष्टीने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यात पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी केले. भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीस प्रथमच अपर पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित राहिल्याने या बाबीचेच नागरिकांना विशेष कौतुक वाटले.
आगामी दोन महिने होणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने शुक्र वारी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सरंगल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरंगल यांनी शहरातील शांतता कायम असल्याचे नमूद केले.
सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, क्र ाइम ब्रँच युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बडेकर, शांतता कमिटी सदस्य अशोक पंजाबी, मधुकर भालेराव, जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवे, बिलाल खतीब, शंकर बर्वे, शरयू डांगळे, अंजली शिंदे, नगरसेविका समिना मेमन, वसीम पिरजादे, एजाज मकराणी, शहर ए काजी सय्यद मोनुद्दीन, एजाज काजी, शोकत सय्यद आदी शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. गत तीन दिवसांपासून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या पाहणीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक सरंगल दौºयावर आले आहेत. शुक्रवारी त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये येऊन तेथील गुन्हयांच्या संदर्भात माहिती घेऊन पोलीस स्टेशनची पाहणी केली.
गुन्हेगारांचा छडा लावण्यास यश
पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी शहरातील सुव्यवस्था कायम असून, मुथूट फायनान्ससारख्या गुन्ह्याचा व संबंधित गुन्हेगारांचा छडा लावण्यात यश आल्याचे सांगितले. तसेच लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासह अन्य कोणतीही माठी दुर्घटना घडली नसल्याचे त्यांनी नमूद केले, तर नागरिकांनी सरंगल पोलीस आयुक्त असताना शहरात सुरू केलेल्या कोम्बिंग आॅपरेशन, आॅलआउट यांसारख्या योजना विद्यमान पोलीस आयुक्तांनीदेखील कायम ठेवल्या असल्याबाबत बहुतांश नागरिकांनी समाधान व्यक्त केले.