एचएएल कामगार संघटनेच्या सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:33 AM2020-03-15T00:33:23+5:302020-03-15T00:33:56+5:30
एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा गदारोळात पार पडली. भानुदास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेमध्ये ऐनवेळच्या विषयामध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये पुनरूक्ती असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी काही जणांनी माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याने सभेत गदारोळ झाला. त्यातच सभा संपविण्यात आली.
ओझर : येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा गदारोळात पार पडली. भानुदास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेमध्ये ऐनवेळच्या विषयामध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये पुनरूक्ती असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी काही जणांनी माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याने सभेत गदारोळ झाला. त्यातच सभा संपविण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी भानुदास शेळके होते. विरोधी गटातील निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर बसण्यास बहिष्कार टाकला.प्रारंभी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी केले. त्यास उपस्थितांनी मंजुरी दिली.
ऐनवेळी येणाºया विषयांवर विजयराज जाधव यांनी पाच वर्षांचा वेतन करार,गेट पंचिंगसह विविध प्रश्न उपस्थित करीत पदाधिकाºयांनी कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने कामगारांची माफी मागावी अशी मागणी केली .त्यावर ढोमसे यांनी वेतन कराराच्या बाबतीत संघटना समर्थन करीत नाही परंतु कामगार हित समोर ठेवून परिस्थितीजन्य योग्य निर्णय संघटनेने घेतला आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले.यावेळी अनिल मंडलिक यांनी वेतन करार करताना तुम्ही कामगारांना वेठीस धरले.त्यात कामगारांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप केला. त्यावर ढोमसे यांनी संपाबाबत न्यायालयीन प्रक्रिया कुठेही चुकलेली नव्हती. त्यासाठी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले होते. अजूनही बेंगळूरू येथील मुख्य कार्यालयातील संबंधितांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. माजी सरचिटणीस संजय कुटे यांनी बदलीला मान्यता का दिली,कॅफेटेरिया,फिटमेंट यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरु वात केली. इतर कामगारांनाही बोलायचे असल्याने त्यांनी माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे गदारोळाला सुरूवात झाली. त्यातच सत्ताधारी व विरोधी समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची होत गदारोळ झाला. वार्षिक सर्वसाधारण सभेला वेळेची मर्यादा असल्याने या गदारोळातच राष्ट्रगीताला सुरूवात झाली आणि अध्यक्ष भानुदास शेळके यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
विरोधी पदाधिकाºयांनी झळकावले फलक
समोर बसलेल्या कामगारांमध्ये वेगवेगळे फलक झळकत होते.त्यात पाच ऐवजी दहा वर्षांचा झालेला वेतन करार,बेसिक वेतनात बारा टक्के फिटमेंट, तर २२ ते २५ टक्के कॅफेटेरिया देऊ केलेले असल्याने त्याला विरोध करण्यासाठी विरोधी पदाधिकाºयांनी सभेत फलक झळकवले.