पंचरंगी सामन्याकडे शहरवासीयांचे लक्ष

By admin | Published: November 12, 2016 10:32 PM2016-11-12T22:32:12+5:302016-11-12T22:35:59+5:30

पंचरंगी सामन्याकडे शहरवासीयांचे लक्ष

The attention of the city dwellers towards the five-star match | पंचरंगी सामन्याकडे शहरवासीयांचे लक्ष

पंचरंगी सामन्याकडे शहरवासीयांचे लक्ष

Next

संजीव धामणे  नांदगाव
येथील नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधील लढती प्रेक्षणीय ठरणार आहेत. एकूण मतदारांची संख्या २७४१ असून, पुरुष १४१६ व महिला १३२५ मतदार आहेत. या प्रभागात महात्मा गांधी चौक, बालाजी चौक, महात्मा फुले चौक, महावीर मार्ग असा भाग येतो. दोन वेशींमधले हे क्षेत्र व्यापारी पेठेचा एक भाग असल्याने काहीसा उच्चभ्रू समजला जाणारा मतदार वर्ग हे वैशिष्ट आहे. असे असले तरी कमी उत्पन्न असलेल्या गटातील मतदारांची संख्यासुध्दा लक्षणीय आहे. ४ ब मधून शोभा कासलीवाल व शिवाजी पाटील हे विद्यमान नगरसेवक रिंगणात आहेत.
४ अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव असून, येथे सरळ लढत भाजपाच्या प्रगती निकम व शिवसेनेच्या चांदनी खरोटेमध्ये होत आहे. ४ ब सर्वसाधारण असून, पंचरंगी लढतीत सुमीत गुप्ता (काँग्रेस), प्रशांत संत (भाजपा), शोभा कासलीवाल (शिवसेना), शिवाजी पाटील (अपक्ष), राकेश बागोरे (अपक्ष) आहेत.
मुकुंद खरोटे सराफी बाजारातले मोठे नाव आहे. त्यांचा सामाजिक व दानधर्म क्षेत्रात बोलबाला आहे. त्यांची मुलगी चांदणी येथून उभी आहे. यापूर्वी ते नगरसेवक व शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. शिवसेना जिल्हाध्यक्ष सुहास कांदे व माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या खरोटे यांचेशी असलेल्या संबंधांमुळे ही उमेदवारी पुढे आली आहे. भाजपा उमेदवार प्रगती निकम यांचे पती डॉ. पुष्कर निकम यांनी आधी निवडणूक लढविली आहे. या भागातील मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जवळीक साधणारी असली तरी समस्यांची जाणींव ठेवून त्यांची सोडवणूक करणारा व आॅन डिमांड उपलब्ध असेल अशा उमेदवाराच्या शोधात मतदार आहेत. तसेच जातीच्या मतांची बेरीज व वजाबाकी हा ही मुद्दा आहेच.



 

Web Title: The attention of the city dwellers towards the five-star match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.