शरद पवार यांच्या सभेकडे उत्तर महाराष्ट्राचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:26 PM2018-03-09T14:26:30+5:302018-03-09T14:26:30+5:30
राज्यातील शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली असून, उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शनिवारी सायंकाळी चार वाजता येथील गोल्फ क्लब मैदानावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : राष्टÑवादीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोप सभेनंतर तब्बल दहा वर्षानंतर पहिल्यांदाच येथील गोल्फ क्लब मैदानावर शरद पवार व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जाहीर सभा होत असून, वर्षभरावर येवून ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीबरोबरच आगामी काळात सत्ताधाºयांशी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना या सभेतून दिला जाणार आहे. शनिवारी सकाळी पक्ष नेत्यांचे शहरात आगमन होणार असून, त्यानिमित्ताने शहरात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.
राज्यातील शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली असून, उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शनिवारी सायंकाळी चार वाजता येथील गोल्फ क्लब मैदानावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, खासदार सुप्रीया सुळे, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार असून, त्यादृष्टीने जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्टÑवादीचे स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. सुमारे दिड लाख नागरिक या सभेसाठी उपस्थित राहतील असा दावा केला जात असून, त्यासाठी ठिकठिकाणी बैठका, मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे, शिवाय शहरात फलक, झेंडे, बॅनर लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. राष्टÑवादी या निमित्ताने उत्तर महाराष्टÑातील आपले बळ अजमाविणार आहे.
केंद्र व राज्यातील बदललेल्या राजकीय समिकरणाच्या पार्श्वभुमीवर होत असलेल्या या जाहीर सभेत शरद पवार काय संबोधित करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असले तरी, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची सुरू असलेली तयारी, अलिकडेच झालेल्या पुर्वाेत्तर तीन राज्यांच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी बजावलेली भुमिका, राष्टÑपुरूषांच्या पुतळ्यांची झालेली विटंबना, एनडीए सरकारमधून तेलगु देसम सारख्या पक्षाने घेतलेली फारकत या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना सत्ताधाºयांच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्षाचा संदेश देण्याचा व त्याचनिमित्ताने निवडणुकीची तयारी करण्याचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.