बारावीच्या ३८६७ विद्यार्थ्यांचे पुरवणी परीक्षा निकालाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:14 AM2020-12-24T04:14:25+5:302020-12-24T04:14:25+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत महिन्यात ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२३) जाहीर होणार आहे.
बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही सहभागी होता येणार आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च व तंत्रशिक्षणाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात बारावीच्या पुरवणी परीक्षेला १३ केंद्रांवर कला शाखेचे २ हजार २२३ विज्ञानचे ५५५, वाणिज्यचे ७११ व एमसीव्हीसीचे ३७५ असे एकूण ३ हजार ८६४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या विद्यार्थ्यांच्या भाविष्यातील दिशा या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नाशिक विभागातून बारावीच्या पुरवणी परीक्षेला ७ हजार ४०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यासर्व विद्यार्थ्यांचे आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे लक्ष लागले आहे.