रेशन दुकानदारांच्या माघारीवर पुरवठा खात्याचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:53 AM2017-08-03T00:53:44+5:302017-08-03T00:53:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शासनाने प्रलंबित मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी पुकारलेला बेमुदत संप दुसºया दिवशीही कायम असला तरी, नाशिक जिल्ह्णात संपकरी रेशन दुकानदारांमध्ये फूट पडल्यामुळे प्रशासन आशावादी असून, आणखी दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्याविरुद्ध कारवाईचा विचार केला जात आहे.
मंगळवारपासून (दि. १) राज्यातील रेशन दुकानदारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत संप पुकारला असून, मागण्या मान्य होईपर्यंत धान्य न उचलण्याचे व वितरित न करण्याचे जाहीर केले आहे. बुधवारी दुसºया दिवशीही संप कायम असला तरी, नाशिक जिल्ह्णातील काही रेशन दुकानदारांनी या संपात सहभागी न होण्याचे ठरविले आहे. साधारणत: २६०० दुकानदारांपैकी ११०० दुकानदार संपात सहभागी नाहीत, त्यामुळे नाशिक जिल्ह्णात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही दुकानदारांनी बुधवारी धान्य उचलण्यासाठी चलने भरली आहेत. या संपाबाबत रेशन दुकानदारांमध्ये फूट पडल्यामुळे काहींनी संघटनेचे आदेश असल्यामुळे संप करावा लागत असल्याची कबुली प्रशासनाकडे दिली असून, येत्या दोन दिवसात संप मिटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरवठा खात्यानेही आस्ते कदम उचलण्याचे ठरविले आहे.