सखी मतदान केंद्रांसह ‘सेल्फी वॉल’चे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 11:50 AM2019-10-21T11:50:19+5:302019-10-21T12:04:52+5:30

Maharashtra Election 2019 मतदान केंद्रांच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘सेल्फी वॉल’चाही तरूणाईसह मोठ्यांनी उत्साहात आनंद लुटला. ‘व्होट कर नाशिककर’ या ब्रीदनुसार बोटावरील शाई दाखवित मतदारांनी सेल्फी वॉलमध्ये आपला फोटो क्लिक केला.

Attraction of 'Selfie Wall' with popular polling stations | सखी मतदान केंद्रांसह ‘सेल्फी वॉल’चे आकर्षण

सखी मतदान केंद्रांसह ‘सेल्फी वॉल’चे आकर्षण

Next
ठळक मुद्देकेंद्रांवर मदतनीसांसह व्हीलचेअरही पहावयास मिळत आहेतकेंद्राच्या उंबरठ्यावर आकर्षक रांगोळी मतदान जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न

नाशिक : शहरासह जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. प्रत्येक मतदान केंद्रांवर मदतनीसांसह व्हीलचेअरही पहावयास मिळत आहेत. तसेच शहरासह जिल्ह्यात महिलांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्र संकल्पना राबविण्यात आली आहे. या मतदान केंद्रांचे महिलांमध्ये विशेषत: तरूणाईत मोठे आकर्षण पहावयास मिळाले. याबरोबरच मतदान केंद्रांच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘सेल्फी वॉल’चाही तरूणाईसह मोठ्यांनी उत्साहात आनंद लुटला. ‘व्होट कर नाशिककर’ या ब्रीदनुसार बोटावरील शाई दाखवित मतदारांनी सेल्फी वॉलमध्ये आपला फोटो क्लिक केला.

अशी आहेत सखी मतदान केंद्रे
मतदारसंघ मतदान केंद्र इमारतनाशिक (पूर्व)- पुणे विद्यार्थिगृह अभियांत्रिकी कॉलेज, म्हसरूळ.
नाशिक (मध्य)- महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय, गंगापूररोड.
नाशिक (पश्चिम)- नवजीवन विद्यालय, शिवशक्ती चौक, सिडको.
देवळाली- देवळाली हायस्कूल, धोंडीरोड,छावणी परिषद.
इगतपुरी- झेड. पी. प्रायमरी स्कूल, टिटोली, इगतपुरी.
नांदगाव- जिल्हा परिषद शाळा, साकोरा.
मालेगाव (मध्य)- आरमा प्राथमिक शाळा, खोली नं.३, नवापूरा वॉर्ड.
मालेगाव (बाह्य)- पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव कॅम्प
बागलाण- जिजामाता गर्ल्स हायस्कूल ज्यु. कॉलेज, सटाणा.
कळवण- झेड.पी. सेमी इंग्लिश स्कूल, कळवण बुदू्रक.
चांदवड- झेड.पी. उर्दू प्रायमरी स्कूल, चांदवड.
येवला- जनता विद्यालय,विंचूररोड, येवला.
सिन्नर- चांडक कन्या विद्यालय, सिन्नर
निफाड- वैनतेय विद्यालय ज्यू. कॉलेज, निफाड.
दिंडोरी- व्ही. एन. नाईक कॉलेज, दिंडोरी.

Web Title: Attraction of 'Selfie Wall' with popular polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.