उपनगराध्यक्षपदी अतुल पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 10:41 PM2020-02-05T22:41:13+5:302020-02-06T00:46:46+5:30
कळवण नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीचे नगरसेवक अतुल पगार यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक अतुल पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र निर्धारित वेळेत दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
कळवण : नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीचे नगरसेवक अतुल पगार यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक अतुल पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र निर्धारित वेळेत दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
विद्यमान उपनगराध्यक्ष जयेश पगार यांनी राजीनामा दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात येऊन घोषणा करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अतुल पगार यांचे एकमेव नामनिर्देशन दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी. ए. कापसे यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी सचिन माने उपस्थित होते. निवडीबाबत घोषणा होताच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. उपनगराध्यक्ष निवडीप्रसंगी नगराध्यक्ष रोहिणी महाले, गटनेते कौतिक पगार, मावळते उपनगराध्यक्ष जयेश पगार, बाळासाहेब जाधव, सुनीता पगार, अनिता जैन, रंजना जगताप, अनुराधा पगार, रंजना पगार, अनिता महाजन, भाजपचे नगरसेवक दिलीप मोरे, साहेबराव पगार, योगेश पगार व मुरलीधर अमृतकार उपस्थित होते.
या निवडीप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, अरु ण पगार, जितेंद्र पगार, गौरव पगार, राजेंद्र पगार, आबासाहेब पगार, साहेबराव पगार, अविनाश पगार, मनोज पगार, प्रशांत पगार, मोयोद्दीन शेख, अनिल पगार, संजय पगार, किरण पगार, तेजस पगार, दादा निकम आदींसह तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप व शिवसेनेचे सदस्य आम्ही एकसंघ असून, आमची महाविकास आघाडी साडेचार वर्षांपासून आहे. कळवण शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून मिळालेल्या संधीचे सोने करून जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार व सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करून शहर विकासासाठी प्रयत्नशील राहील.
- अतुल पगार, उपनगराध्यक्ष, कळवण नगरपंचायत.