अबब, ४६ टन प्लास्टिक पिशव्या?

By admin | Published: June 17, 2017 12:52 AM2017-06-17T00:52:12+5:302017-06-17T00:52:21+5:30

नाशिक : पहिल्याच पावसाळ्यात अवघे शहर जलमय झाल्यानंतर नागरिकांच्या रोषातून वाचण्यासाठी प्लास्टिकवर खापर फोडून बांधकाम विभाग मोकळा झाला

Aub, 46 tons plastic bags? | अबब, ४६ टन प्लास्टिक पिशव्या?

अबब, ४६ टन प्लास्टिक पिशव्या?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पहिल्याच पावसाळ्यात अवघे शहर जलमय झाल्यानंतर नागरिकांच्या रोषातून वाचण्यासाठी प्लास्टिकवर खापर फोडून बांधकाम विभाग मोकळा झाला, परंतु आरोग्य विभागाने त्यावर कडी करत अवघ्या दोन दिवसांत शहरात ४५ टन प्लास्टिक कॅरीबॅग सापडल्याचा दावा आरोग्यविभागाने केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग शहरात दोन दिवसांत सापडल्या आणि त्या संकलित झाल्या हा सर्वच संशयास्पद भाग असून, कॅरीबॅगचा वापर नागरिक करीत असल्याचे सांगत प्रशासन जबाबदारी झटकत आहे.
गेल्या बुधवारी (दि.१४) नाशिक शहरात सायंकाळी दीड तास झालेल्या पावसामुळे शहर जलमय झाले. शहरात पावसाळी गटार योजना अंमलात असताना आणि महापालिकेने पावसाळापूर्व कामांतर्गत नालेसफाईसह अन्य कामे केल्याचा दावा केला असताना हा प्रकार घडला आणि पालिकेचे पितळ उघडे पडले त्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर रोष व्यक्त होत असताना वेगवेगळ्या सबबी सांगितल्या जात आहेत. नागरिकांनी फेकलेल्या प्लास्टिक आणि कॅरीबॅग नाल्यांमध्ये आणि चेंबरच्या झाकणांमध्ये तुंबल्याने पाणी प्रवाही होऊ शकले नाही अशी भूमिका बांधकाम विभागाने केला आहे.

Web Title: Aub, 46 tons plastic bags?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.