लासलगांव बाजार समितीत उद्यापासुनसर्व शेतीमालाचे लिलाव होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 12:15 AM2021-05-23T00:15:20+5:302021-05-23T00:17:49+5:30

लासलगांव : कोरोना संदर्भात शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवार (दि.२४) पासुन बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवरील तसेच खानगाव नजिक तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावरील सर्व शेतीमालाचे लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

Auction of all agricultural commodities will start from tomorrow at Lasalgaon Bazar Samiti | लासलगांव बाजार समितीत उद्यापासुनसर्व शेतीमालाचे लिलाव होणार सुरू

लासलगांव बाजार समितीत उद्यापासुनसर्व शेतीमालाचे लिलाव होणार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देशेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते.

लासलगांव : कोरोना संदर्भात शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवार (दि.२४) पासुन बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवरील तसेच खानगाव नजिक तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावरील सर्व शेतीमालाचे लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांनी १२ ते २३ मे या कालावधीकरीता नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते.
बंद असलेले शेतीमाल लिलावाचे कामकाज सोमवारपासून पुर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सचिवांची बैठक घेऊन काही अटी व शर्तींनुसार बाजार समित्यांमधील लिलावाचे कामकाज सुरू करण्याच्या सुचना दिलेल्या आहे.
सदर अटी व शर्तींनुसार बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर दररोज 500 शेतमाल वाहनांचेच लिलाव करण्यात येणार आहे. त्यानुसार लासलगांव मुख्य बाजार आवारावर कांदा, धान्य, फळे व भाजीपाला विक्रीसाठी भ्रमणध्वनीवर शेतकऱ्यांनी आपले नांव व शेतमाल विक्रीची नोंदणी करावी. नोंदणी झालेनंतर शेतकरी बांधवांना आलेल्या एसएमएसद्वारे ज्या-त्या बाजार आवारावर आपल्या शेतीमालाची विक्री करावी.
बाजार समितीत शेतमाल विक्री करणेसाठी एका वाहनाबरोबर एक व्यक्ती व शेतमाल खरेदीसाठी एका पेढीचे एका प्रतिनिधीस प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, गुमास्ता, कामगार वर्ग यांनी प्रवेशद्वारावरच कोरोना निगेटिव्ह अहवाल बाजार समितीच्या सेवकांना दाखविणे व त्याप्रमाणे बाजार आवारात सामाजिक अंतर ठेऊन मास्क वापरणे बंधनकारक राहणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Web Title: Auction of all agricultural commodities will start from tomorrow at Lasalgaon Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.