‘प्लॅस्टिक वादा’वरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:38 AM2018-06-24T00:38:16+5:302018-06-24T00:38:33+5:30
प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी रोखण्यासाठी शासनाने शनिवारपासून प्लॅस्टिक वापरावर बंदी लागू केल्याने त्याचा पहिलाच फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना बसला.
पंचवटी : प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी रोखण्यासाठी शासनाने शनिवारपासून प्लॅस्टिक वापरावर बंदी लागू केल्याने त्याचा पहिलाच फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना बसला. शेतमाल भरण्यासाठी व्यापाºयांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने त्याविरुद्ध महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केल्याने शनिवारी दुपारी जवळपास तासभर लिलाव बंद पडले. अखेर व्यापाºयांनी पोते तसेच पुठ्ठ्याच्या कार्टूनमध्ये शेतमाल भरण्यास सुरुवात केल्यानंतर लिलाव सुरळीतपणे चालू झाले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक जिल्ह्यातून दैनंदिन शेकडो शेतकरी शेतमाल प्लॅस्टिक कॅरेटमध्ये विक्रीसाठी घेऊन येतात. लिलाव झाल्यानंतर व्यापारी फळभाज्या वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांत भरून तो चारचाकी वाहनांतून अन्य बाजारपेठेत पाठवित असतात. शासनाने प्लॅस्टिकबंदी लागू करून प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्यास जागेवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने शेतमाल भरायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी सकाळी बाजार समितीत काही व्यापाºयांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर दुपारी १२ वाजता सुरू होणारी लिलाव प्रक्रिया रखडली. यामुळे व्यापारी हतबल झाले. त्यानंतर तासभराने पुन्हा लिलाव सुरू झाले.
व्यापा-यांनी मांडल्या अडचणी
लिलाव झाल्यानंतर रिकामे कॅरेट शेतकºयांना परत करावे लागत असल्याने फळभाज्या कशात भरून पाठवायच्या यावरून व्यापारी हतबल झाले. त्यानंतर काही व्यापाºयांनी बाजार समिती कार्यालयात जाऊन अडचणी मांडल्या; मात्र शासन निर्णय असल्याने व त्यातच उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने कोणी काही करू शकत नाही असे स्पष्ट केल्याने व्यापारी मागे फिरले त्यानंतर तासभराने म्हणजे दुपारी १ वाजता लिलाव सुरू झाले. प्लॅस्टिकबंदीमुळे व्यापाºयांनी प्लॅस्टिक पिशव्याऐवजी पोते तसेच पुठ्ठ्याच्या कार्टूनमध्ये शेतमाल भरून अन्य बाजार समितीत रवाना केला.