जिल्ह्यातील शेतमालाचे लिलाव आजपासून बंद

By admin | Published: June 16, 2014 12:27 AM2014-06-16T00:27:12+5:302014-06-16T01:05:45+5:30

व्यवहार थंडावणार : ‘लेव्ही’चा मुद्दा पेटला

Auction of farmland in the district is closed from today | जिल्ह्यातील शेतमालाचे लिलाव आजपासून बंद

जिल्ह्यातील शेतमालाचे लिलाव आजपासून बंद

Next

 

लासलगाव : ‘लेव्ही’च्या मुद्यावरून सोमवारपासून (दि.१६) नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतील शेतीमालांच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग न घेण्याचा निर्णय माथाडी कामगार व व्यापाऱ्यांनी घेतला असून, त्यामुळे बाजार समित्यांमधील व्यवहार थंडावणार आहेत.
सध्या ३४ टक्के ‘लेव्ही’ वसूल केली जाते. त्यात दहा टक्के वाढ करून ती ४४ टक्के करावी अशी माथाडी कामगारांची मागणी असून, त्यास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. जुुने दर लागू ठेवले तरच लिलावात सहभागी होणार असल्याची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे तर नव्या दरानेच काम करणार असल्याची भूमिका माथाडी संघटनेच्या नेत्यांनी घेतली आहे. तोलाईचा दोन रुपये बारा पैसे असा जुना दर होता तो जिल्हा उपनिबंधकांच्या मान्यतेनुसार तीन रुपये पाच पैसे करण्यात आला आहे, तर हमालीकरिता असलेला दोन रुपये अडुसष्ट पैसे त्यात बदल करून तो दर तीन रुपये शहाऐंशी पैसे असा करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्र्वी जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील पंधरा बाजार समिती कार्यालयांनी हमाली व तोलाई दरात वाढ केलेली आहे. यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शेतकऱ्यांकडून लेव्हीची रक्कम वसूल करू नये असे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर आता माथाडी कामगार बाजार समितीचे नोकर की व्यापाऱ्यांचे या मुद्यावरून निफाडच्या दिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट आहे, असे असताना शेतीमालाचे लिलाव बंद करण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Auction of farmland in the district is closed from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.