बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:18 PM2020-02-26T14:18:08+5:302020-02-26T14:20:03+5:30
लासलगाव : राज्यातील माथाडी कामगारांच्या शासनाकडे आणि संबंधितांकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील सर्व बाजारसमित्या, शासकीय गोदाम, मालधक्का व विविध आस्थापनातील शेकडो माथाडी कामगारांनी बुधवारी लाक्षणिक संप पुकारला.
लासलगाव : राज्यातील माथाडी कामगारांच्या शासनाकडे आणि संबंधितांकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील सर्व बाजारसमित्या, शासकीय गोदाम, मालधक्का व विविध आस्थापनातील शेकडो माथाडी कामगारांनी बुधवारी लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद झाल्याने करोडोचे व्यवहार ठप्प झाले . प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्र मक भूमिका घेतली आहे. १८ समस्यांचे निवेदन शासनाला दिले आहे.
कामगारांच्या समस्यांविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदत संपाची भुमिका स्पष्ट केली आहे. .माथाडींचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. माथाडी बोर्डांवर पूर्णवेळ अध्यक्ष नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. वर्षानुवर्षे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही काहीच होत नसल्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.