कर्जवसुलीसाठी जमिनींचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:35 AM2019-05-04T01:35:05+5:302019-05-04T01:35:31+5:30
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली असून, मार्चपासून धडक वसुली मोहीम सुरू करण्यात येऊन त्यात विविध कार्यकारी संस्थांच्या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर सहकार कायदा नियम १०७ अन्वये बँकेचे नाव लावून जमीन जप्ती करून जमिनीच्या लिलावाच्या प्रक्रिया करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहे.
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली असून, मार्चपासून धडक वसुली मोहीम सुरू करण्यात येऊन त्यात विविध कार्यकारी संस्थांच्या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर सहकार कायदा नियम १०७ अन्वये बँकेचे नाव लावून जमीन जप्ती करून जमिनीच्या लिलावाच्या प्रक्रिया करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहे.
नाशिक तालुक्यातील शिलापूर येथील माधव रामचंद्र कहांडळ यांच्याकडे दोन लाख ६६ हजारांची थकबाकी आहे. त्यांना सात दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती. १९९७ पासून थकबाकीदार असलेले कहांडळ यांच्या ५ एकर ११ गुंठे जागेचा जाहीर लिलाव ३१ मे रोजी केला जाणार आहे. याबाबत जाहीर लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली असून, येवला तालुक्यातील जळगाव नेऊर दशरथ जयाजी शिंदे, कोटमगाव विका संस्थेचे थकबाकीदार सभासद मुरलीधर गोपीनाथ कोटमे, देवठाण विका संस्थेचे थकबाकीदार नंदू विठ्ठल जाधव व शेकू लक्ष्मण वºहे यांच्याही शेतजमीन विक्रीची जाहीर लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जमिनीचे जाहीर लिलाव जळगाव नेऊर येथे ३१ मे रोजी, कोटमगाव येथे ४ जून रोजी व देवठाण येथे ७ जून रोजी लिलाव केला जाणार आहे.
बँकेचे आवाहन
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिंडोरी, निफाड, मालेगाव व सटाणा या तालुक्यातील मोठ्या प्रभावशाली थकबाकीदारांच्या शेत जमिनीचे लिलाव करण्यात येणार आहे. तरी जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.