मानोरीत हनुमान मंदिराच्या इनामाचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:40 AM2018-05-19T00:40:06+5:302018-05-19T00:40:06+5:30

मानोरी : येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराच्या इनामाचा लिलाव माहे मे २०१८ ते मे २०२० या तीन वर्षांकरिता येथील प्रगतशील शेतकरी बद्रीनाथ शिवाजी शेळके यांनी पावणेतीन एकरसाठी ८१ हजार रुपये तर विठ्ठल रामचंद्र पठाडे यांनी एक एकरसाठी २९ हजार रुपये तीन वर्षांकरिता हा इनाम घेतला आहे.

The auction of Manorant Hanuman Temple prizes | मानोरीत हनुमान मंदिराच्या इनामाचा लिलाव

मानोरीत हनुमान मंदिराच्या इनामाचा लिलाव

googlenewsNext

मानोरी : येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराच्या इनामाचा लिलाव माहे मे २०१८ ते मे २०२० या तीन वर्षांकरिता येथील प्रगतशील शेतकरी बद्रीनाथ शिवाजी शेळके यांनी पावणेतीन एकरसाठी ८१ हजार रुपये तर विठ्ठल रामचंद्र पठाडे यांनी एक एकरसाठी २९ हजार रुपये तीन वर्षांकरिता हा इनाम घेतला आहे. सुमारे साठ ते सत्तर वर्षांपासून या इनामाच्या लिलावाची पद्धत आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. यंदाच्या या लिलावाने सर्वात जास्त उच्चांक गाठल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सदर लिलावरूपी जमा झालेल्या रकमेतून गावातील सर्व मंदिरांची सुधारणा करण्याचे ग्रामस्थांकडून एकमत करण्यात आले. यावेळी वामनराव शेळके, चांगदेव शेळके, नंदाराम शेळके, मधुकर शेळके, बाळासाहेब वावधाने, सचिन वावधाने, पोपट शेळके, बाबासाहेब तिपायले, धनंजय तिपायले, देवराम शेळके, वाल्मीक शेळके, भाऊसाहेब फापाळे, एकनाथ शेळके, रंगनाथ शेळके, दत्तू साळवे, बाळासाहेब शेळके, केदू साठे, बाळासाहेब शेळके, पुंजाराम शेळके, पंढरीनाथ तिपायले, साहेबराव शेळके, चिंधू शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: The auction of Manorant Hanuman Temple prizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक