मनमाड बाजार समितीत धान्याचे लिलाव बंद, शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून निर्णय, सर्वत्र शुकशुकाट

By प्रसाद गो.जोशी | Published: April 4, 2024 03:52 PM2024-04-04T15:52:50+5:302024-04-04T15:53:39+5:30

नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने याबाबत ठाम भूमिका घेतली आहे

Auction of grains stopped in Manmad Bazar Committee, decision to avoid trouble to farmers | मनमाड बाजार समितीत धान्याचे लिलाव बंद, शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून निर्णय, सर्वत्र शुकशुकाट

मनमाड बाजार समितीत धान्याचे लिलाव बंद, शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून निर्णय, सर्वत्र शुकशुकाट

मनमाड (हर्षद गद्रे ): नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत व्यापाऱ्यांनी हमाली, वराई, तोलाई, बाजार पट्टी मधून न कापण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लिलाव प्रक्रियेत अडथळा येऊ नये, शेतकऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी गुरुवार ४ एप्रिल पासून मनमाड बाजार समितीतील कांदा, मका, धान्याचे लिलाव पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्यात आले आहेत.  यामुळे मनमाड बाजार समिती आवारात शुकशुकाट होता.

नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने याबाबत ठाम भूमिका घेतली आहे.  आज नाशिक येथे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Auction of grains stopped in Manmad Bazar Committee, decision to avoid trouble to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.