उमराणे बाजार समितीत दुसर्या दिवशीही कांद्याचे लिलाव बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 09:18 PM2020-10-27T21:18:07+5:302020-10-28T01:19:12+5:30
उमराणे : शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसर्या दिवशीही व्यापारी सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्पच होते.परिणामी भाववाढीची अपेक्षा असतानाच व्यापार्यांवर शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली असुन शासनाने योग्य तोडगा काढुन लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत जवळपास सर्वच कांदा व्यापार्यांकडे शंभर ते दिडशे टन कांदा शेडमध्ये पडुन आहे. त्यामुळे तो माल निकाशी होईपर्यंत व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी होणार नसल्याची भुमिका घेतल्याने पुुढील आदेश येईपर्यंत लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.परंतु अद्यापही काही व्यापार्यांच्या माल निकाशी न झाल्याने शिवाय माल साठवणुक निर्बंध निर्णयावर तोडगा न निघाल्याने आज दुसर्या दिवशीही ( मंगळवार दि.२७ ) येथील लिलाव ठप्पच होते. परिणामी एकीकडे काही प्रमाणात शिल्लक असलेला उन्हाळी कांदा खराब होत असतानाच कांदा दरवाढ रोखण्यासाठी शासनाकडून निर्यातबंदी, कांदा आयात, प्राप्तीकर विभागाकडून चौकशी, माल साठवणुकीवर निर्बंध आदी अडचणी निर्माण करुन व्यापार्यांसह शेतकर्यांना वेठीस धरत असल्याने व्यापारी व शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली आहे.
शासनाने योग्य तो तोडगा काढुन बाजार समितीतील लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांकडुन करण्यात येत आहे. @ प्रतिक्रिया - गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे चाळीत साठवणुक केलेला कांदा पुर्णतः खराब झाल्याने सद्यस्थितीत अत्यंत कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. व त्याची प्रतवारीही कमालीची घसरली आहे.त्यामुळे माल विक्री करणे नितांत गरजेचे असताना शासनाने माल साठवणुकीवर निर्बंध लादून व्यापार्यांबरोबर शेतकर्यांनाही वेठीस धरले आहे.
संभाजी देवरे ( शेतकरी ). @ शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने व्यापार्यांकडे आजमितीस शंकर ते दिडशे टन कांदा पडुन आहे. शिवाय जेथे माल पाठवायचा आहे तेथेही माल पडुन असल्याने मागणीत घट आली असुन कांद्याचे बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध मागे घ्यावेत किंवा किमान शंभर टनापर्यंत मर्यादा वाढवुन द्यावी.
- संजय खंडेराव देवरे ( कांदा व्यापारी )