बागलाणमध्ये थकबाकीदारांच्या सात ट्रॅक्टरचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:53+5:302021-02-12T04:13:53+5:30

सटाणा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी थकबाकी वसुुलीकरता कठोर पावले उचलून धडक मोहीम राबविली ...

Auction of seven tractors of arrears in Baglan | बागलाणमध्ये थकबाकीदारांच्या सात ट्रॅक्टरचा लिलाव

बागलाणमध्ये थकबाकीदारांच्या सात ट्रॅक्टरचा लिलाव

Next

सटाणा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी थकबाकी वसुुलीकरता कठोर पावले उचलून धडक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत बागलाण तालुक्यातील बड्या सभासद थकबाकीदारांच्या जप्त करण्यात आलेल्या सात ट्रॅक्टरच्या लिलावास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लिलावानंतर बँकेला थकबाकीपोटी १६ लाख पाच हजार रुपयांची रक्कम मिळाली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. थकबाकीचे प्रमाण वाढल्याने बँक प्रशासनासमोर थकीत कर्जवसुलीचे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनातर्फे कठोर पावले उचलण्यात आली आहेत. याअंतर्गत बँकेने धडक मोहीम राबवत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या नियम १९६१ नुसार जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर थकबाकीच्या कर्जवसुलीसाठी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार बागलाण तालुक्यातील मोठ्या थकबाकीदार सभासदांकडून सात ट्रॅक्टरची जप्ती प्रशासनाने केली होती. सन २००९ ते २०११ या कालावधीतील हे मोठे सभासद बँकेचे थकबाकीदार असून, बँक प्रशासनाने थकीत कर्जवसुलीसाठी त्यांना सातत्याने नोटिसा बजावल्या, सौजण्याने मागणीही केली होती. मात्र, त्यांनी थकीत कर्ज रकमेचा भरणाच न केल्याने बँक प्रशासनाने नाइलाजास्तव त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली होती. तालुक्याचे सहायक निबंधक महेश भडांगे यांनी या ट्रॅक्टर्सचे मूल्यांकन केल्यानंतर इजमाने (ता. बागलाण) येथे आज त्यांचा लिलाव करण्यात आला. लिलाव प्रक्रियेस चांगला प्रतिसाद मिळाला असून, सातही ट्रॅक्टर्सच्या लिलावानंतर बँकेला थकबाकीपोटी १६ लाख पाच हजार रुपयांची रक्कम मिळाली. यावेळी बँकेचे कक्ष अधिकारी पी.डी. शेवाळे, पालक अधिकारी बबनराव गोडसे, विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे, निरीक्षक बी.एन. सूर्यवंशी, एच.एल. भामरे, तुषार अहिरे, ए.के. खैरनार, एस.व्ही. भामरे, व्ही.डी. धोंडगे आदी उपस्थित होते.

----------------

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जुन्या थकबाकी वसुलीसाठी नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदारांना कर्जात भरघोस सवलत दिलेली आहे. याव्यतिरिक्त योजनेस येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे. त्यामुळे जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी आपल्यावर होणाऱ्या कायदेशीर कारवाईची कटुता टाळून लवकरात लवकर थकबाकीचा भरणा करावा आणि बँकेस सहकार्य करावे.

-सचिन सावंत, संचालक, जिल्हा बँक

------------------

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे तालुक्यातील बड्या आणि प्रभावशाली सभासद थकबाकीदारांकडून जप्त केलेल्या ७ ट्रॅक्टरच्या लिलावाप्रसंगी उपस्थित बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी.

(११ सटाणा १)

Web Title: Auction of seven tractors of arrears in Baglan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.