येवला बाजार समितीत उद्यापासून लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 08:22 PM2021-05-22T20:22:59+5:302021-05-23T00:00:54+5:30

येवला : येथील कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य आवार व अंदरसुल उपबाजार आवरावर सोमवार (दि.२४) पासून शेतमाल लिलाव पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती मुख्य प्रशासक वसंत पवार यांनी दिली.

Auction at Yeola Market Committee from tomorrow | येवला बाजार समितीत उद्यापासून लिलाव

येवला बाजार समितीत उद्यापासून लिलाव

Next
ठळक मुद्देशेतमाल विक्रीस आणताना कोरोना चाचणी बंधनकारक

येवला : येथील कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य आवार व अंदरसुल उपबाजार आवरावर सोमवार (दि.२४) पासून शेतमाल लिलाव पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती मुख्य प्रशासक वसंत पवार यांनी दिली.

जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील सूचनेप्रमाणे कोरोना काळात बाजार समितीचे लिलाव कामकाज पूर्ववत सुरू करणेसाठी सोमवारी (दि.२४) मुख्य आवार येवला येथे ५०० (ट्रॅक्टर) व उपबाजार अंदरसुल येथे ३०० (ट्रॅक्टर) कांदा लिलावासाठी ( फक्त ट्रॅक्टर) वाहनांची नोंदणी रविवार (दि.२३) मुख्य आवारासाठी तसेच उप बाजार अंदरसुलसाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. मोबाईलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच सोमवारी (दि. २४) बाजार समितीत प्रवेश दिला जाईल असे मुख्य प्रशासक पवार, सचिव कैलास व्यापारे व प्रशासकीय मंडळ सदस्यांनी कळविले आहे.

Web Title: Auction at Yeola Market Committee from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.