बाजार समितीत लिलाव चालू रहावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 12:38 AM2021-05-11T00:38:11+5:302021-05-11T00:39:49+5:30

जळगाव नेऊर : वारंवार व्यापारी अर्जावरून अमावस्या व इतर किरकोळ कारणावरून सतत लिलाव बंद न ठेवता पणन संचालकांनी नुकत्याच दिलेल्या आदेशाचे पालन करावे अशा आशयाचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने सहाय्यक निबंधक यांना देण्यात आले आहे.

Auctions should continue in the market committee | बाजार समितीत लिलाव चालू रहावेत

बाजार समितीत लिलाव चालू रहावेत

Next
ठळक मुद्देराज्यात कुठेही नसलेला प्रवेश कर रद्द करण्यात यावा

जळगाव नेऊर : वारंवार व्यापारी अर्जावरून अमावस्या व इतर किरकोळ कारणावरून सतत लिलाव बंद न ठेवता पणन संचालकांनी नुकत्याच दिलेल्या आदेशाचे पालन करावे अशा आशयाचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने सहाय्यक निबंधक यांना देण्यात आले आहे.

सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ येत असून कांदा हा नाशवंत असल्याने बाजार समित्या चालू राहिल्यास बाजार समित्यांना एकच वेळेस गर्दी न होता कांदा विक्री होत राहील, तसेच शेतमाल विशेषत: मका विक्रीचे पैसे रोख देण्यात यावे. तसेच इतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा भरण्याचे तीस-चाळीस रुपये असताना आपल्या बाजार समितीमध्ये पन्नास ते साठ रुपयांच्या पुढे दर आकारला जात आहे, ते कमी करून राज्यात कुठेही नसलेला प्रवेश कर रद्द करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.
त्याची तातडीने अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, नाहीतर लॉकडाउन निवळल्यानंतर प्रहार संघटना वतीने रस्त्यावर उतरणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कोट...

सध्या लोकप्रतिनिधीचे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद करण्याचे घाटत आहे.

रब्बी हंगाम तोंडावर आलाय, शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्याला खते बियाणे, आदींसाठी शेतीभांडवल उभं करणं गरजेच आहे. अशात बाजार समित्या बंद ठेवल्यास पुढील हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होऊन अडचणीत असलेला शेतकरी अधिक अडचणीत येणार आहे.

उलट बाजार सतत चालू राहिल्याने गर्दी विभागली जाऊन संसर्गाचा धोका टळेल. या करीता बाजार बंद चा निर्णय आत्मघातकी ठरून अधिक कोरोना संसर्गास निमंत्रण ठरेल.
- हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार संघटना, येवला.
तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने ब्रेक द चैन अंतर्गत कर्फ्यु असल्याने शासनाच्या वतीने बाजार समितीत्या बंद ठेवण्यासाठी आवाहन केले जाते आहे. बाजार समित्या बंद असल्याने कांद्याचे बाजार कमी झाले आहे, त्यामुळे अडचण फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर, व्यापाऱ्यांनाही आहे. मालाला गिर्हाईक नाही. तरी सुध्दा व्यापारी या महामारीत जीव धोक्यात घालून शासनाच्या नियमानुसार लिलाव सुरू ठेवणार आहे.
- सुनील अट्टल, कांदा व्यापारी, अंदरसुल.

Web Title: Auctions should continue in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.