कथक नृत्याविष्कारांनी जिंकली प्रेक्षकांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:53 AM2018-11-13T00:53:08+5:302018-11-13T00:53:22+5:30
नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे दोनदिवसीय आवर्तन संगीत समारोहाला सोमवारी (दि.१२) सुरुवात झाली. प्रथम पुष्पात प्रारंभी कौशिकी चक्र वर्ती यांनी गणेशवंदना सादर के ल्यानंतर अहिरभैरव रागातील तराणा सादर झाला.
नाशिक : नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे दोनदिवसीय आवर्तन संगीत समारोहाला सोमवारी (दि.१२) सुरुवात झाली. प्रथम पुष्पात प्रारंभी कौशिकी चक्र वर्ती यांनी गणेशवंदना सादर के ल्यानंतर अहिरभैरव रागातील तराणा सादर झाला. पंडित गोपीकृष्ण यांच्या पारंपरिक तराण्यावरील नृत्याविष्काराच्या सादरीकरणाने प्रेक्षांची मने जिंकली. आवर्तनच्या द्वितीय पुष्पात औरंगाबादच्या नृत्यांगना सुश्री पार्वती दत्ता यांनी कथक नृत्यविष्कारातून ‘शिव पंचाक्षर स्तोत्र’ सादर केले. त्यानंतर त्यांच्या शिष्या शीतल भामरे व श्रीया दीक्षित यांनी ताल झपतालचे वर्णन करणारी पंडित बिरजू महाराज यांची रचना प्रस्तुत केली. शेवटी पार्वती दत्ता यांनी ‘मुरलिया मन में बसी तोरी शाम’ ही पारंपरिक ठुमरी सादर केली. त्यांना तबल्यावर चारु दत्त फडके, सारंगीवर संदीप मिश्रा आणि गायन सुरंजन खंडाळकर यांनी साथसंगत केली.
त्यांच्या अभिनय, पदन्यासाने रसिक प्रेक्षक भारावून गेले. सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले.