अथर्व वैरागकर यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:23 AM2019-07-27T00:23:57+5:302019-07-27T00:24:13+5:30
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे नाशिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील गायक, वादक कलावंतांना प्रतिष्ठानचे व्यासपीठ मिळावे म्हणून हा उपक्र म सुरू करण्यात येत आला.
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे नाशिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील गायक, वादक कलावंतांना प्रतिष्ठानचे व्यासपीठ मिळावे म्हणून हा उपक्र म सुरू करण्यात येत आला.
यापूर्वी अखंड संकीर्तनाच्या निमित्ताने सर्व कलाकार एक त्र आले होते. यमन रागात ‘सांज भई पिया घर नही आये साखिरी, सुगम रूप सुहाने सलोने माई, येरी आली पिया बीन आदी पदांचे अथर्व वैरागकर यांनी केलेले सादरीकरण व डॉ. उद्धव अष्टूरकर यांच्या सतार वादनाने रिसकांना मंत्रमुग्ध केले.
प्रतिष्ठानतर्फे नाशिक संगीतसभा शुक्रवारी (दि.२६) स्मारकातील स्वागत सभागृहात पार पडली. पहिल्या सत्रात युवाकलावंत अथर्व वैरागकर यांच्या गायनाचा कार्यक्र म झाला. अथर्व हा प्रसिद्ध गायक पंडित शंकरराव वैरागकर यांचा नातू असून, संगीतसभेच्या निमित्ताने त्याचा पहिलाच कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. त्याला सागर कुलकर्णी (संवादिनी), ओंकार वैरागकर (तबला), शरयू विंचूरकर यांनी साथसंगत केली. प्रसिद्ध तबलावादक नितीन पवार यांनी डॉ. उद्धव अष्टूरकर यांना साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात पंडित शंकरराव वैरागकर यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. पुरिया कल्याण आलाप, जोड झाला भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला. याप्रसंगी गायक मकरंद हिंगणे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे आदी उपस्थित होते.