दिव्यांगांसाठी आॅडिओ लायब्ररी

By vijay.more | Published: August 20, 2018 01:41 AM2018-08-20T01:41:54+5:302018-08-20T01:44:13+5:30

अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडिओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडिओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य तसेच एमपीएससी अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे़

Audio Library for Divas | दिव्यांगांसाठी आॅडिओ लायब्ररी

दिव्यांगांसाठी आॅडिओ लायब्ररी

Next
ठळक मुद्दे१६ ग्रंथालयांमध्ये सुविधा महापालिकेची मदत प्रत्येक केंद्रावर २०० आॅडिओ सीडी

नाशिक : अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडिओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडिओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य तसेच एमपीएससी अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे़
आमदार बच्चू कडू यांनी शहरातील अंध, अपंग व दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी तत्कालीन महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर या दोघांमध्ये वादावादीही झाली होती़ यानंतर शहरातील अंध-अपंगांना शिक्षणाची सोय करण्यासाठी १६ ठिकाणी आॅडिओ लायब्ररी तयार करण्यात आल्या आहेत़ तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी २० कोटी रुपयांच्या निधीचा आराखडाही तयार केला आहे़
या निधीतूनच या आॅडिओ लायब्ररीची सुविधा पुरविण्यात आल्या असून, अंध विद्यार्थ्यांना या केंद्रामधून शैक्षणिक सीडी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ याबरोबरच या प्रत्येक केंद्रावर २०० आॅडिओ सीडी उपलब्ध करून दिल्या आहेत़ या आॅडिओ लायब्ररीचा अंधांकडून चांगला उपयोग केला जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे़
आॅडिओ लायब्ररी असलेली ग्रंथालये
४अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिका, नवीन पंडित कॉलनी़
४बाळ गणेश फाउंडेशन, पंडित कॉलनी़
४माई लेले विकास विद्यालय, गंगापूर रोड़
४एनएफबीएम अंधासाठी व्यवसाय केंद्र, कृषीनगर
४राष्ट्रमाता जिजाऊ वाचनालय, भद्रकाली
४शासकीय अंधशाळा, नाशिक-पुणे रोड
४समर्थ अभ्यासिका, गंगापूररोड
४नागरिक अभिनव वाचनालय, देवी चौक, नाशिकरोड
४महापालिका सार्वजनिक वाचलनालय, नाशिकरोड
४नॅब, एमआयडीसी सातपूर
४लोकमान्य वाचनालय, मेरी
४सार्वजनिक वाचनालय, म्हसरूळ
४सार्वजनिक वाचनालय, मखमलाबाद
४डॉ़ फडके वाचनालय, खुटवडनगर
४शिल्पकार भालेराव वाचनालय, जाणता राजा कॉलनी, पंचवटी
४सार्वजनिक वाचनालय, हनुमानवाडी, पंचवटी़

Web Title: Audio Library for Divas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.