आॅगस्टमध्ये हिरे कुटुंबीयांचा राष्टवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:57 AM2018-05-01T01:57:17+5:302018-05-01T01:57:17+5:30
एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत ठेवणाऱ्या हिरे कुटुंबीयांचा राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला असून, येत्या आॅगस्ट महिन्यात नाशकात भव्य मेळव्यात शक्तिप्रदर्शनाद्वारे हिरे कुटुंबीय आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यासंदर्भात सोमवारी पुणे येथे हिरे बंधूंनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.
नाशिक : एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत ठेवणाऱ्या हिरे कुटुंबीयांचा राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला असून, येत्या आॅगस्ट महिन्यात नाशकात भव्य मेळव्यात शक्तिप्रदर्शनाद्वारे हिरे कुटुंबीय आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यासंदर्भात सोमवारी पुणे येथे हिरे बंधूंनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदार डॉ. अपूर्व हिरे व अद्वय हिरे हे दोघेही पुण्यात मुक्कामी असून, रविवारी राष्टÑवादीच्या बैठकीसाठी त्यांना खास पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निमंत्रित केल्याचे सांगण्यात आले. रविवारी राष्टÑवादीच्या सर्वच नेत्यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. सोमवारी मात्र हिरे यांच्या राष्टÑवादी प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी झालेल्या चर्चेत राजेंद्र डोखळे, देवीदास पिंगळे, अर्जुन टिळे, लक्ष्मण मंडाले आदी उपस्थित होते. आमदार डॉ. अपूर्व हिरे यांना सिडको-सातपूर विधानसभा मतदारसंघातून राष्टÑवादीकडून, तर अद्वय हिरे यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने हिरे बंधू प्रचाराचा नारळच फोडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तयारीसाठी वेळ
च्पक्षप्रवेश करताना हिरे यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील कोण कोण असणार याचीही प्राथमिक बोलणी करण्यात आली असून, समर्थकांना राजी करण्यासाठी येत्या दोन महिन्यांत तयारीसाठी वेळ देऊन आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात नाशिक शहरात शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर मेळाव्याद्वारे हा प्रवेश सोहळा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.