अधिकाऱ्यामुळे थांबली वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:03 AM2018-03-29T01:03:40+5:302018-03-29T01:03:40+5:30

पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी यांनी तातडीने तोडण्यात आलेल्या वृक्षाची माहिती घेऊन संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उद्यान निरीक्षक यांना दिले.

 Authorities stopped trees | अधिकाऱ्यामुळे थांबली वृक्षतोड

अधिकाऱ्यामुळे थांबली वृक्षतोड

Next

इंदिरानगर : पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी यांनी तातडीने तोडण्यात आलेल्या वृक्षाची माहिती घेऊन संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उद्यान निरीक्षक यांना दिले.  सकाळी दहाच्या सुमारास विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे या प्रभाग क्र मांक २३ व ३० मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील अनेक अनधिकृत लावण्यात आलेले होर्डिंग्स व बॅनरची पाहणी करत असताना पेठेनगर रस्त्यालगतच असलेल्या गोपाळकृष्ण कॉलनीतील शिवाजीराव ठाकरे यांच्या मालकीच्या बंगल्याच्या परिसरात सुमारे पाच ते सहा वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याचे दिसून आले. ही गोष्ट लक्षात येताच सोनवणे यांनी आपले वाहन थांबवून संबंधित बंगाल्याचे मालक ठाकरे यांना ‘आपण वृक्ष तोडण्याची परवानी घेतली आहे का?’ अशी विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीच परवानगी नसताना त्यांनी वृक्षांची कत्तल केल्याचे आढळून आले. तातडीने उद्यान निरीक्षक यांना संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title:  Authorities stopped trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.