आदेशाचे अधिकार केवळ आपत्ती प्राधिकरणालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:20 PM2021-04-08T22:20:07+5:302021-04-09T00:31:29+5:30

नाशिक: आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील आदेश काढण्याच े अधिकार केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणालाच असून इतर विभागांनी केवळ आदेशाचे अनुपालन करण्याच्या सुचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी इतर विभागांनी काढलेले आदेश रद्द केले आहेत.

The authority to order only belongs to the Disaster Authority | आदेशाचे अधिकार केवळ आपत्ती प्राधिकरणालाच

आदेशाचे अधिकार केवळ आपत्ती प्राधिकरणालाच

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले : इतर विभागाचे आदेश केले रद्द

नाशिक: आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील आदेश काढण्याच े अधिकार केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणालाच असून इतर विभागांनी केवळ आदेशाचे अनुपालन करण्याच्या सुचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी इतर विभागांनी काढलेले आदेश रद्द केले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. दि. ५ एप्रिल रोजी पोलीस आयुक्तांनी लग्न सोहळ्यासाठी मंगल कार्यालयांना दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते. बैठकीस मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधक्षिक सचिव पाटील, पोलीस उपायुक्त संजय बारकुंडे आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी राज्य शासनाने ह्यब्रेक द चैनह्ण अंतर्गत दिलेले आदेश तसेच मुख्य सचिवांनी दुरदृश्टप्रणालीच्या माध्यमातून दिलेल्या सुचनांच्या आधारे बैठकीत अधिकाºयांना निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी इतर विभागाने कार्यवाही करणे अपेक्षित असल्याची आठवण अधिकाºयांना करून दिली.

बैठकीत जिल्हाधिकाºयांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाराची उजळणी अधिकाºयांसमोर केली. आपत्ती विषयक सर्व निर्णय घेणे व आदेश पारित करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही जिल्ह्यातील सर्वोच्च संस्था आहे. प्राधिकरणाने घेतलेले निर्णय सर्व विभागांवर बंधनकारक असून सर्व विभागांनी आपत्ती संदभार्तील कार्यवाही करीत असताना या प्राधिकरणाने दिलेल्या निदेर्शांचे पूर्णत:अनुपालन करणे या कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन संदभार्तील यापुढील सर्व आदेश केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निर्गमित केले जातील व स्वतंत्रपणे कोणताही विभाग आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पूर्वपरवानगीशिवाय आपत्ती व्यवस्थापना संदभार्तील कोणतेही आदेश काढणार नाही असाही निर्णय सर्वानुमते घेतला.

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वगळता अन्य विभागांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी यापूर्वी पारित केलेले आदेश रद्द करून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन यथोचित आदेश निर्गमित करण्याचे स्वातंत्र्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असल्याचे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.

Web Title: The authority to order only belongs to the Disaster Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.