विंचूरदळवीत स्वयंचलित हात धुण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:55 PM2020-05-11T21:55:02+5:302020-05-11T23:32:22+5:30
सिन्नर : स्मार्ट ग्राम योजनेतील बक्षिसाच्या रकमेतून विंचूरदळवी ग्रामपंचायतीने कार्यालयाबाहेर व सार्वजनिक चौकात हात धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा खरेदी केली असून, तिची अंमलबजावणी सुरू केली आहे.
सिन्नर : स्मार्ट ग्राम योजनेतील बक्षिसाच्या रकमेतून विंचूरदळवी ग्रामपंचायतीने कार्यालयाबाहेर व सार्वजनिक चौकात हात धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा खरेदी केली असून, तिची अंमलबजावणी सुरू केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय बाहेर अशाप्रकारे हात धुण्याची यंत्रणा कार्यान्वित करणारी तालुक्यातील ही पहिली ग्रामपंचायत आहे.
सिन्नर तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांच्या संकल्पनेतून यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विंचूरदळवी येथील ग्रामपंचायतीत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती सॅनिटायझरने हात धुवूनच कार्यालयात प्रवेश करत आहे.
सार्वजनिक चौकातही आधुनिक हात धुण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या आधुनिक हात धुण्याच्या यंत्राचा वापर करावा, ग्रामपंचायत कार्यालयात अतिमहत्त्वाचे काम असेल तर प्रथम हात धुवूनच आतमध्ये प्रवेश करावा, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.