सटाण्यात स्वयंचलित पाणीपुरवठा योजना पाणीप्रश्न निकाली : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निधीला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:45 AM2017-11-11T00:45:59+5:302017-11-11T00:46:32+5:30

शहरासाठी वरदान ठरणाºया पुनंद पाणीपुरवठा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Automatic water supply scheme in the adjacency: water dispute approved in the presence of Chief Minister | सटाण्यात स्वयंचलित पाणीपुरवठा योजना पाणीप्रश्न निकाली : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निधीला मान्यता

सटाण्यात स्वयंचलित पाणीपुरवठा योजना पाणीप्रश्न निकाली : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निधीला मान्यता

Next
ठळक मुद्देयोजना अद्ययावत आणि स्वयंचलित साडेतीन कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीपाठीशी राहण्याचे अभिवचन

सटाणा : शहरासाठी वरदान ठरणाºया पुनंद पाणीपुरवठा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ही योजना अद्ययावत आणि स्वयंचलित करण्यासाठी साडेतीन कोटी
रुपयांच्या अतिरिक्त निधीला मान्यता दिली आहे. यामुळे शहराचा अनेक वर्षांपासून भिजत पडलेला पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.
शहर पाणीपुरवठा योजनेसह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तत्काळ सूचना दिल्या असून, शहराच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहण्याचे अभिवचनदेखील त्यांनी दिले. शहराच्या विविध प्रलंबित योजनांसंदर्भात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. शेषराव पाटील, संदीप सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात डॉ. शेषराव पाटील, गटनेते संदीप सोनवणे, राहुल सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते.

Web Title: Automatic water supply scheme in the adjacency: water dispute approved in the presence of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.