जिल्ह्यात ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:24+5:302021-04-06T04:14:24+5:30

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने साहजिकच मागील वर्षीपेक्षा जादा ऑक्सिजनचा वापर होऊ लागला आहे. जिल्ह्यात दररोज ...

Availability of 85 metric tons of oxygen in the district | जिल्ह्यात ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्धता

जिल्ह्यात ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्धता

Next

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने साहजिकच मागील वर्षीपेक्षा जादा ऑक्सिजनचा वापर होऊ लागला आहे. जिल्ह्यात दररोज ६४ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन वापरला जातो, तर आपल्याकडे ८५ मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता अतिरिक्त बेडस‌्, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बेडस‌् तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करणे शक्य असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्णांना दररोज किमान ६५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन वापरला जात आहे, तर सद्य:स्थितीत जिल्ह्यात ८५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. सिलिंडर वाहतुकीसाठी वेळ लागत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूकदारांशीदेखील चर्चा केली जात आहे. तमिळनाडूहून २७ ड्युरा सिलिंडर ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी तयारी करण्यात येत असून असे सिलिंडर मिळाल्याने जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडस‌्ला जादा बिल आकारले जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिल्या. खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेडस‌् सरकारी निमयाप्रमाणे राखून ठेवण्यात आले असून त्याचे सरकारी दर ठरलेले आहेत. त्यापेक्षा जादा दर आकारले तर त्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाने सुमारे २००० हजार बेडस‌ची व्यवस्था केलेली आहे. जिल्हा रुग्णालय, एसएमबीटी तसेच वैद्यकीय महाविद्यालय येथे एकूण एक हजार बेडस‌्ची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात आणखी १५०० बेडस‌् उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे सुमारे चार ते साडेजार हजार बेडस‌्ची उपलब्धता झाल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Availability of 85 metric tons of oxygen in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.