जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान; मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा
By संकेत शुक्ला | Published: May 20, 2024 04:08 PM2024-05-20T16:08:44+5:302024-05-20T16:09:47+5:30
सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यापासून अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते
नाशिक - लोकसभेसाठी नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांमध्ये सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अजूनही तीन तासांमध्ये ही आकडेवारी वाढण्याची शक्यता असून मागील लोकसभेपेक्षा यंदा जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यापासून अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. उन्हाचा त्रास कमी व्हावा, यासाठी सकाळी लवकर मतदान करण्याकडे लोकांचा कल दिसून आला. मात्र दुपारीही या रांगा कायम दिसून आल्या. वाढत्या उन्हातही मतदार मतदानासाठी बाहेर पडतान दिसत होते.
दिंडोरी मतदारसंघामध्ये दुपारपर्यंत ४५.९५ तर नाशिक मतदारसंघामध्ये ३९.४१ टक्के मतदान नोंदवण्यात आले. त्यात चांदवड (४७.५७), दिंडोरी (४८.०२), कळवण (५३.८४), नांदगाव (४१.८८),निफाड (४४.३७), येवला (४०.६७) तर नाशिक मतदारसंघासाठी देवळाली (४०.२), इगतपुरी (४४.७७), नाशिक मध्य (४०.२१), नाशिक पूर्व (३८.१२), नाशिक पश्चिम (३२.२८), सिन्नर (४५.३) याप्रमाणे मतदान झाले आहे.