अविनाश डोळस हे कर्तेसुधारक : रावसाहेब कसबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:55 PM2018-11-17T22:55:22+5:302018-11-17T22:55:30+5:30
नाशिक : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक विचार, परराष्ट्र धोरण तसेच विचारांना समजावून घेत चिकित्सकपणे अभ्यास करून १९७० च्या दशकात आंबेडकरी चळवळीत आलेल्या पहिल्या पिढीतील उत्तम लेखक, समीक्षक, नाटककार, संयमी व्यक्तिमत्व असलेले कालकथित प्राध्यापक अविनाश डोळस हे परिवर्तनाचे साक्षीदार व कर्तेसुधारक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले़
नाशिक : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक विचार, परराष्ट्र धोरण तसेच विचारांना समजावून घेत चिकित्सकपणे अभ्यास करून १९७० च्या दशकात आंबेडकरी चळवळीत आलेल्या पहिल्या पिढीतील उत्तम लेखक, समीक्षक, नाटककार, संयमी व्यक्तिमत्व असलेले कालकथित प्राध्यापक अविनाश डोळस हे परिवर्तनाचे साक्षीदार व कर्तेसुधारक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले़ मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते़ यावेळी विविध मान्यवरांनी प्रा़ डोळस यांच्या आठवणींना उजाळा दिला़
प्रा़ डोळस यांच्या सामाजिक कार्याबाबत बोलताना कसबे यांनी सांगितले की, डॉ़ आंबेडकर हे केवळ एका जातीचे नव्हे तर संपूर्ण मनुष्यजातीचे आहेत, त्यांचे विचार सर्व घटकांपर्यंत पोहोचविणारी, जगातील घटनांचा विचार करून स्वत:ची मते मांडणारी डोळस यांची पिढी होती़ भारतीय शेतकऱ्यांची अवस्था आंबेडकरांनी १९२९ साली एक प्रबंधात मांडली होती, मात्र अजूनही त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत़ दलित युवक आघाडीची स्थापना करून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम डोळस आणि त्यांच्या सहका-यांनी केले़ चिकित्सक वृत्तीच्या अविनाशने मराठवाड्यातील दुष्काळ, नामांतर चळवळीत तुरुंगवासही भोगला़ संयमी व अभ्यासपूर्ण वक्तव्य करणारा अविनाश हा जातीच्या बाहेर पडून आंबेडकरी क्रांती करू इच्छिणारा तरुण अशी त्याची प्रतिमा होती़ आयुष्यातील दु:खाशी सतत संघर्ष करणारा, स्वप्रेरणा व कतृत्वाने जगणे अर्थपूर्ण करणारा अविनाश होता, असे कसबे यांनी सांगितले़
डॉ़ संजय जाधव यांनी औरंगाबाद वसतिगृह विद्यार्थी आंदोलनापासून ते मुंबईतील आझाद मैदानावर भिडे गुरुजींच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या प्रा़ अविनाश डोळस यांच्या कार्यास उजाळा दिला़ यावेळी प्राग़ंगाधर अहिरे, अरुण ठाकूर, दीपचंद दोंदे, डॉ़संजय जाधव यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या़ यावेळी नगरसेवक कविता कर्डक, राजू देसले, रोहिदास गांगुर्डे, करुणासागर पगारे आदींसह चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़