उन्हाळ्यात लस्सी, ताक, दही ताक, बर्फाचा गोळा टाळाच: वैद्य सावंत

By संजय पाठक | Published: April 6, 2019 10:00 PM2019-04-06T22:00:04+5:302019-04-06T22:03:40+5:30

उन्हाळ्यात थंडावा वाटवा यासाठी सामान्यत: रस्त्यावरील दुकानावरून बर्फाचा गोळा, दही आणि ताक सहजपणे घेत असले तरी हे पेय स्पर्शाला थंड असते प्रत्यक्षात मात्र शरीरात उष्ण असतात. त्यामुळे अशाप्रकारचे पेय टाळावे असे आवाहन नाशिक येथील आयुर्वेद वैद्य राहूल सावंत यांनी केले.

Avoid collecting lassi, buttermilk, yogurt, ice, ice in the summer: Vaidya Sawant | उन्हाळ्यात लस्सी, ताक, दही ताक, बर्फाचा गोळा टाळाच: वैद्य सावंत

उन्हाळ्यात लस्सी, ताक, दही ताक, बर्फाचा गोळा टाळाच: वैद्य सावंत

googlenewsNext
ठळक मुद्देस्पर्शाने थंड वाटणारे पदार्थ प्रत्यक्षात असतात उष्णउन्हामुळे रोगराईबरोबरच वाढते चिडचिडआवश्यक असल्यासच बाहेर पडा

 नाशिक- सर्वत्र उन्हाळा वाढु लागला आहे. पारा चाळीशी पार होत असून त्यामुळे अंगाची काहीली होत असतानाच विविध प्रकारचे आजार देखील होत आहेत. उन्हाळ्यात थंडावा वाटवा यासाठी सामान्यत: रस्त्यावरील दुकानावरून बर्फाचा गोळा, दही आणि ताक सहजपणे घेत असले तरी हे पेय स्पर्शाला थंड असते प्रत्यक्षात मात्र शरीरात उष्ण असतात. त्यामुळे अशाप्रकारचे पेय टाळावे असे आवाहन नाशिक येथील आयुर्वेद वैद्य राहूल सावंत यांनी केले. सध्या जाणवत असलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद..

प्रश्न- सध्या उन्हाळा वाढू लागला आहेत. त्यामुळे खाण्यापिण्याबरोबरच काय पथ्य पाळली पाहिजेत?
सावंत- सध्या प्रखर उन्हाळा आहे. त्यामुळे बाहेर पडताना मुळातच काळजी घ्यायला हवी. बाहेर पडल्यानंतर उन्हाच्या कडाक्याने काहीली झाल्यानंतर लोक सहज लस्सी, ताक घेतात, अनेक युवक आणि लहान मुले बर्फाचा गोळा घेतात. परंतु स्पर्शाने थंड असलेली ही पदार्थ शरीरात मात्र गरम असतात. त्याचा प्रतिकुल परीणाम होत असतो. चक्कर येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे दही, ताक, लस्सी ऐवजी त्याऐवजी दुध, तूप, लोणी अशाप्रकारचे पदार्थ असले पाहिजे. तर ते उपयुक्त ठरेल. याशिवाय थंडच पदार्थ बाहेरही घ्यायचे असतील तर लिंंबु सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हं, नारळ पाणी घेतले पाहिजे. क्षार वाढविण्यारे पदार्थ प्रामुख्याने घेतले पाहिजेत.

प्रश्न- उन्हाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे?
सावंत- नाशिकचे सध्याचे तापमान बघता अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडले पाहिजे अन्यथा बाहेर जाणे टाळले पाहिजे. सुती कपड्यांचा वापर करावा, फळांचा रस जास्तीत जास्त घेतले पाहिजे.

प्रश्न - रोगराईच्या दृष्टीने हा काळ अधिक महत्वाचा असतो काय?
सावंत- सध्या ऋतुबदलाचा काळ आहे. त्यामुळे एडस, मधुमेह, दीर्घ काळ सोयारीसीस सारखे आजार असलेल्यांना त्याच प्रमाणे लहान मुले आणि वृध्दांना त्रास होत असतो. याकाळात स्वाईन फ्ल्यूसारख्या आजारांना पुरक विषाणू बळावतात. त्यामुळे काळजी घ्यावी. घरी आल्यानंतर उटणे लावून आंघाळ देखील करावी तसेच त्वचेला खोबरेल तेल लाावावे. त्यामुळे त्वचेवर थेट सुर्यकिरण पडण्याआधी आधी तेलावर पडतात. याशिवाय या काळात डोकेदुखी वाढते, स्वभाव चिडचिडा होतो. घामामुळे केसही गळतात एकंदरच परिणामकारक ऋतु असल्याने त्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

मुलाखत- संजय पाठक


 

Web Title: Avoid collecting lassi, buttermilk, yogurt, ice, ice in the summer: Vaidya Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.