अभयारण्यात वर्षा सहलीचा आनंद लुटताना निसर्गाची हानी टाळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:16+5:302021-07-12T04:10:16+5:30

नाशिकपासून अवघ्या ७०किलोमीटरवरील भंडारदरा परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात दरवर्षी हजारो पर्यटक भटकंतीसाठी हजेरी लावतात. अभयारण्य क्षेत्रातील आदिवासी गावांना याद्वारे ...

Avoid the damage of nature while enjoying the rainy season in the sanctuary ...! | अभयारण्यात वर्षा सहलीचा आनंद लुटताना निसर्गाची हानी टाळा...!

अभयारण्यात वर्षा सहलीचा आनंद लुटताना निसर्गाची हानी टाळा...!

Next

नाशिकपासून अवघ्या ७०किलोमीटरवरील भंडारदरा परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात दरवर्षी हजारो पर्यटक भटकंतीसाठी हजेरी लावतात. अभयारण्य क्षेत्रातील आदिवासी गावांना याद्वारे रोजगारही मिळतो. गावकरी आणि वन-वन्यजीव विभाग एकमेकांच्या हातात हात घालून शाश्वत विकासाच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिक वन्यजीव विभागाकडून अभयारण्याच्या संरक्षणाकरिता व वन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून पर्यटकांचे प्रमाण घसरले आहे.

यावर्षी पावसाने जरी ओढ दिली असली तरी आतापर्यंत झालेल्या थोड्याफार पावसाने अभयारण्याचे सौंदर्य बहरू लागले आहे. वन्यजीव विभागाने येथील तपासणी नाके अधिकाधिक सक्षम केले आहेत. वनरक्षकांसह ग्राम परिस्थिकीय विकास समितीच्या माध्यमातून तरुणांची येथे नेमणूक करून त्यांना रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे. तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तपासणी करून पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. पर्यटकांनी वन तपासणी नाक्यावर सहकार्य करणे आवश्यक आहे.

या अभयारण्याची भंडारदरा आणि राजुर ही दोन वनपरिक्षेत्रे आहेत. या दोन्ही वनपरिक्षेत्रांकरिता वन्यजीव विभागाचे स्वतंत्र चमू वनक्षेत्रपालांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत. वन्यजीव कर्मचाऱ्यांकडे वॉकीटॉकी तसेच वाहनांना पीए सिस्टिम यंत्रणा बसविण्यात आली आहे.

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर शेकरू या राज्यप्राण्याच्या अधिवासाकरिताही नावारूपाला येत आहे. धबधब्यांसह अन्य प्रेक्षणीय स्थळांसह पांजरे बेटदेखील विकसित केले जात आहे. न्हानी वॉटरफॉल अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. या धबधब्याच्या ठिकाणी यापूर्वी मातीची एकच पाऊलवाट होती. वन्यजीव विभागाने दोन वाटा तयार करून सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. तसेच संरक्षक लोखंडी रेलिंगदेखील लावली आहे. ठिकठिकाणी प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात आली आहे. अभयारण्यात जागोजागी लावलेल्या सूचना फलकांवरील सूचनांचे पालन प्रत्येकाने काटेकोरपणे केल्यास निसर्गाची हानी टळेल आणि स्वत:चीही सुरक्षितता धोक्यात सापडणार नाही, एवढेच यानिमित्ताने सांगू इच्छितो...!

- गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक, कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

110721\11nsk_7_11072021_13.jpg

गणेश रणदिवे, सहा.वनसंरक्षक नाशिक वन्यजीव

Web Title: Avoid the damage of nature while enjoying the rainy season in the sanctuary ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.