देवळा मुद्रांक देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 05:02 PM2019-03-19T17:02:40+5:302019-03-19T17:03:02+5:30

देवळा : मार्च महिन्यात विविध प्रकारची कर्ज प्रकरणे व शासकीय कामांसाठी लागणारे कोरे मुद्रांक घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जाते, तसेच लिखणावळीसाठी मुद्रांक विक्र ेते जास्तीचे शुल्क आकारत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.

 Avoid giving Deola stamps | देवळा मुद्रांक देण्यास टाळाटाळ

देवळा मुद्रांक देण्यास टाळाटाळ

Next
ठळक मुद्देविक्र ेत्यांना नूतन इमारतीत अद्यापपर्यंत जागा उपलब्ध झाली नसल्यामुळे त्यांना जुन्या कार्यालयाच्या आवारातच कामकाज करावे लागत आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.



देवळा : मार्च महिन्यात विविध प्रकारची कर्ज प्रकरणे व शासकीय कामांसाठी लागणारे कोरे मुद्रांक घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जाते, तसेच लिखणावळीसाठी मुद्रांक विक्र ेते जास्तीचे शुल्क आकारत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.
देवळा तालुक्यात नागरिकांना कोरे मुद्रांक घेण्यासाठी जुन्या तहसील कार्यालय आवारातील मुद्रांक विक्र ेत्यांकडे जावे लागते; परंतु तुटवड्यामुळे मुद्रांक विक्र ेते मुद्रांक नसल्याचे कारण सांगून मुद्रांक देण्यास टाळाटाळ करतात. तहसील कार्यालय शहरापासून तीन कि.मी. वर नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाले असले तरी मुद्रांक विक्र ेत्यांना नूतन इमारतीत अद्यापपर्यंत जागा उपलब्ध झाली नसल्यामुळे त्यांना जुन्या कार्यालयाच्या आवारातच कामकाज करावे लागत आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
शहरात पोलीस ठाणे व स्टेट बँकेची शाखा सुरू झाल्यानंतर सात वर्षांपूर्वी गुंजाळनगर येथे भाड्याच्या जागेत कोषागार सुरू करण्यात आले. यामुळे मुद्रांकांचा तुटवडा आता भासणार नाही अशी सर्वांची अपेक्षा होती; परंतु कोषागार सुरू झाल्यानंतर संबंधित विभागाने स्ट्राँग रूमची सुविधा नाही म्हणून मुद्रांक ठेवता येत नाहीत असे कारण देत मुद्रांक उपलब्ध केले नाहीत. ट्रेझरी असूनही तालुक्यात नेहमीच मुद्रांकांचा तुटवडा असतो.
ग्राहकांना तक्र ार करण्यासाठी महसूल विभागातील सक्षम अधिकाऱ्याचा दूरध्वनी क्र मांक दर्शनी भागात टाकण्यात यावा व तक्र ार पुस्तक ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती, तत्कालीन तहसीलदारांनी तसे आश्वासनही दिले होते; परंतु याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही.
- शशिकांत चितळे, सदस्य, देवळा तालुका ग्राहक पंचायत
देवळा येथे ट्रेझरीमध्ये मुद्रांक उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करीत आहोत. दरवर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक मागणी असलेल्या १०० रुपयांच्या मुद्रांकाचा तुटवडा असतो. नवीन कार्यालयात मुद्रांक विक्रे त्यांना जागेची सोय झाली नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.
- मुद्रांक विक्र ेता, देवळा
फोटो : देवळा शहरात जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेतच अद्यापही मुद्रांक विक्र ेते कामकाज करतात.(19देवळामुद्रांक)

Web Title:  Avoid giving Deola stamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.