आदिवासी, कातकरी लोकांनाशिधापत्रिका देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 06:59 PM2020-12-29T18:59:57+5:302020-12-29T19:00:37+5:30
घोटी : शिधापत्रिका मिळत नसल्याने आदिवासी, कातकरीसह वाड्या-पाड्यातील वस्त्यावर राहणाऱ्या गरीब लाभार्थी कुटुंबांची रेशन धान्याअभावी उपवासमार होत असुन त्यांना शिधापत्रिका देण्यास तहसिल कार्यालयातुन टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेर्धात मंगळवारी (दि.२९) श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठिय्या अंदोलन सुरु करण्यात आले.
घोटी : शिधापत्रिका मिळत नसल्याने आदिवासी, कातकरीसह वाड्या-पाड्यातील वस्त्यावर राहणाऱ्या गरीब लाभार्थी कुटुंबांची रेशन धान्याअभावी उपवासमार होत असुन त्यांना शिधापत्रिका देण्यास तहसिल कार्यालयातुन टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेर्धात मंगळवारी (दि.२९) श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठिय्या अंदोलन सुरु करण्यात आले.
कोरोना संसर्ग काळापासुन अद्यापपर्यंत शासनाने आदिवासी समाजाला केवळ खोटी आश्वासने देवून दिशाभुल करीत बोळवण केली आहे. रानमेवा व रानभाज्या खावुन आदिवासींनी कसे तरी दिवस काढले. मात्र अद्याप लाभार्थीना शिद्यापत्रिका मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असुन जो पर्यंत शिधापत्रिका मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असे संघटनेच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना कळविण्यात आले.
यापुर्वी सुमारे पाच हजार शिधापत्रिकाचे अर्ज दाखल केले. त्या पैकी दिड हजार लाभार्थीना शिधापत्रिका दिल्या. विभक्त, जिर्ण व नवीन कार्ड धारकांना अद्याप शिधापत्रिका मिळाल्या नाहीत. मंगळवारी आंदोलनाच्या दिवशी सुमारे दिड हजार लाभार्थीनीं नव्याने अर्ज दाखल केले असुन मागील लाभार्थीना शिधापत्रिका कधी मिळेल हा मोठा प्रश्न आहे.
आदिवासींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत शासन झोपेचे सोंग घेत असल्याने शासनाविरूद्ध घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. जो पर्यंत शिधापत्रिका मिळणार नाही तो पर्यंत तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहील अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव विजय जाधव यांनी दिली.
यावेळी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष शाम लोंढे, ठाणे विभाग जिल्हा अध्यक्ष दशरथ भालके, तालुका सचिव सुनिल वाघ, तालुका अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा महिला अध्यक्ष निता गावंडा, तालुका सचिव शांताराम भगत, जिल्हा कातकरी समाज अध्यक्ष सुनिल वाघ, तालुका अध्यक्ष काळु निर्गुडे आदिसह शेकडो कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.
ज्या लाभार्थीचे शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त आहेत, त्यापैकी ज्यांच्या पेपरची पुर्तता आहे, त्यांना कार्ड वितरीत केली जात आहेत. काही लाभार्थीचे पेपर अपुर्ण व कागदोपत्रात तृटी आहे त्यांना तसे कळविले आहे. या आंदोलकांपैकी सुमारे दिड हजार कार्ड वितरीत केले जातील. व काहींना टप्याटप्याने दिले जातील. यात कोणीही शिधेपत्रिकेपासुन व शासनाच्या धान्य वितरणापासुन वंचित रहाणार नाही.
- परमेश्वर कासुळे, तहसिलदार.