साकोऱ्यात बॅँकेला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 09:40 PM2020-08-11T21:40:47+5:302020-08-12T00:05:00+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील नागरिकांनी बॅँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावी व वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी करत भारतीय स्टेट बॅँकेच्या साकोरा शाखेला कुलूप ठोकत बाहेर तासभर संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील नागरिकांनी बॅँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावी व वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी करत भारतीय स्टेट बॅँकेच्या साकोरा शाखेला कुलूप ठोकत बाहेर तासभर संताप व्यक्त केला.
ग्रामीण भागातील जनतेला गावातच राष्टिÑयीकृत बॅँकेच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने सन २०१६ मध्ये साकोरा येथे स्टेट बॅँकेची सुरू करण्यात आली. सुरुवातीला वर्षभर गावातीलच कर्मचारी असल्याने कोणालाही कुठलीच अडचण आली नव्हती. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बॅँकेत शाखाधिकारी आणि कर्मचारी हे बाहेरगावचे असल्याने ते अरेरावी करतात. खातेदारांशी उद्धटपणे बोलतात. ज्येष्ठ नागरिकांना दोन-दोन तास बसून ठेवतात व नंतर थम्स येत
नसल्याचे कारण देतात. पीककर्जाची
व्यवस्था केलेली नाही
आदी तक्रारींचा समावेश असलेले निवेदन जि. प. सदस्य रमेश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शाखाधिकारी श्रेयस सातोकर यांना देण्यात
आले.
जि.प. सदस्य बोरसे यांनी वरिष्ठ पातळीवर फोनवर बातचीत करून शाखाधिकारी यासह कर्मचाºयांच्या बदलीसंदर्भात चर्चा केली. त्यावर शाखाधिकारी सातोकर यांनी उपस्थितांची माफी मागून बँकेच्या कारभारात सुधारणा होईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी कुलूप उघडले व कामकाजाला सुरुवात झाली.
यावेळी उपसरपंच सतीश बोरसे, दादा बोरसे, संजय सुरसे, भगवान निकम, सतीशा सोनवणे, देवीदास बोरसे, इंदूबाई बोरसे,
विमलबाई बोरसे, लक्ष्मण बोरसे, अलकाबाई पवार, मंडाबाई मोरे, संतू मोरे, भास्कर अभंग, कमळाबाई बोरसे, नमर्दाबाई बोरसे, चंद्रकला बोरसे, राजेंद्र सुरसे, संजय बोरसे, भारत बोरसे, सुमनबाई कदम, हिराबाई हिरे, रोशनी चव्हाण, रामकृष्ण बोरसे, श्रावण बोरसे, शिवाजी बच्छाव आदी नागरिक उपस्थित होते.नागरिकांसाठी स्टेट बॅँक शाखेची स्थापना करण्यात आली. तिचा नागरिकांना उपयोग होत नसेल तर काय फायदा? बॅँकेच्या कामकाजात वेळीच सुधारणा झाली नाही तर पुन्हा टाळे ठोकण्यात येईल.
- रमेश बोरसे, जि. प. सदस्य, साकोरासुरूवातीला खातेदारांची संख्या कमी असल्याने सर्व कामे वेळेत पूर्ण होत होती. मात्र चार वर्षांत खातेदार
वाढल्याने कर्मचारी अभावी कामे वेळेवर पूर्ण होत नाही. शाखेत एकच कर्मचारी आहे. माझ्या हातात कॅशचा व्यवहार नाही. शाखाधिकारी म्हणून माझ्या अखत्यारित येणारे सर्व कामे मी पूर्ण करतो.
- श्रेयस सातोकर, शाखाधिकारी, स्टेट बॅँक, साकोरा