पंचवटीत ठोकले महावितरण कार्यालयाला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:22+5:302021-02-06T04:25:22+5:30
शुक्रवारी सकाळी दिंडोरीरोड महावितरण कंपनी कार्यालयाला भाजपा कार्यकर्त्यांनी टाळे ठोकून वीज वितरण कंपनी व राज्य शासनाच्या गलथान कारभाराचा निषेध ...
शुक्रवारी सकाळी दिंडोरीरोड महावितरण कंपनी कार्यालयाला भाजपा कार्यकर्त्यांनी टाळे ठोकून वीज वितरण कंपनी व राज्य शासनाच्या गलथान कारभाराचा निषेध केला. शेतकऱ्यांना नोटिसा तसेच चुकीचे देयक पाठविणाऱ्या महावितरण कंपनी आणि सरकारचा धिक्कार असो. चुकीची वीजबिले रद्द करा अशा घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. आंदोलनप्रसंगी भाजपा शहर सचिव अमित घुगे, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, नगरसेवक रुची कुंभारकर, ज्ञानेश्वर काकड, उत्तम उगले, दिगंबर धुमाळ, अनिल वाघ, सोमनाथ बोडके, नितीन माळोदे, संदीप जोशी, संजय संघवी, मनीष बागुल, शिरीष जोंधळे, सविता कुलकर्णी, पूनम ठाकूर, विजय बनछोडे, हर्षद वाघ, प्रवीण भाटे आदी उपस्थित होते. (फोटो ०५ वीज)
--------
वीज देयकांची होळी
वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपाने वीज देयकांची होळी केली. नगरसेवक प्रियंका माने, धनंजय माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला. आंदोलनात प्रभागातील भाजपाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.