पोलिसांचा विरोध झुगारून महावितरणाच्या कार्यालयाला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:11+5:302021-02-06T04:25:11+5:30

नाशिक : कोरोनाकाळात जनतेला वीजबिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीजबिल वसुली करून जनतेला त्रास देत असल्याचा आरोप ...

Avoid MSEDCL office by protesting against police | पोलिसांचा विरोध झुगारून महावितरणाच्या कार्यालयाला टाळे

पोलिसांचा विरोध झुगारून महावितरणाच्या कार्यालयाला टाळे

googlenewsNext

नाशिक : कोरोनाकाळात जनतेला वीजबिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीजबिल वसुली करून जनतेला त्रास देत असल्याचा आरोप करीत राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांचा विरोध झुगारून भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय आवारात प्रवेश करून महावितरणच्या कार्यालय आवारात प्रवेश केला. त्यामुळे पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापटही झाली. अखेर पदाधिकाऱ्यासमवेत कार्यकर्त्यांनीही कार्यालयाच्या आवरात घसून कार्यालयाला कुलूप लावले.

कोरोनाकाळात आलेले अवाजवी वीजबिल भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीजबिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिले दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी महाविकास आघाडीच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची हिंमत महाविकासआघाडी सरकारमध्ये नसेल तर निदान अशी सक्तीने वीजबिले वसुली करणे, थांबवावे अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून जनआंदोलन करेल, अशा इशाराही देवयांनी फरांदे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हिमगौरी आडके, नगरसेवक प्रशांत जाधव, स्वाती भामरे, देवदत्त जोशी, हरिभाऊ लोणारी, गणेश कांबळे, अमित घुगे, पवन भगुरकर, देवा जाधव आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोट..

नाशिकला सापत्न वागणूक

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी केवळ १० टक्के वीजदर सवलत दिली असताना मालेगावला वीजदरात ५० टक्क्यांहून अधिक सवलत दिली जात आहे. महाआघाडी सरकारडून नाशिकला अशाप्रकारे भेद करून सापत्न वागणूक दिली जात आहे.

-देवयानी फरांदे, आमदार

===Photopath===

050221\05nsk_5_05022021_13.jpg

===Caption===

वीज पुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना आमदार देवयानी फरांदे. समवेत लक्ष्मण सावजी, हिमगौरी आडके,  प्रशांत जाधव, स्वाती भामरे, देवदत्त जोशी, हरिभाऊ लोणारी, गणेश कांबळे, अमित घुगे, पवन भगुरकर, देवा जाधव आदी

Web Title: Avoid MSEDCL office by protesting against police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.