ओझरच्या समस्यांबाबत नगरपरिषदेस लावले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 11:18 PM2022-03-07T23:18:29+5:302022-03-07T23:19:05+5:30

ओझर : येथील शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषदेस टाळे लावून आंदोलन छेडण्यात आले. शिवसेनेने नगरपरिषदेसमोर कचरा भरलेल्या गोण्या, रिकामे हंडे, बंद फ्लड लाईट ठेवून लक्षवेधी आंदोलन केले.

Avoid Ozar's problems with the city council | ओझरच्या समस्यांबाबत नगरपरिषदेस लावले टाळे

ओझरच्या समस्यांबाबत नगरपरिषदेस लावले टाळे

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाविरोधात मुख्य द्वारावरच शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

ओझर : येथील शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषदेस टाळे लावून आंदोलन छेडण्यात आले. शिवसेनेने नगरपरिषदेसमोर कचरा भरलेल्या गोण्या, रिकामे हंडे, बंद फ्लड लाईट ठेवून लक्षवेधी आंदोलन केले.

यात जोपर्यंत ओझर नगरपरिषद तथा निफाड तहसीलदार शरद घोरपडे हे नगरपरिषदेत येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा शिवसेनेच्यावतीने घेण्यात आला. याआधी २८ फेब्रुवारी रोजी यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात येऊन तीन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. परंतु नगरपरिषद प्रशासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने हे आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.
येथील शहरात व उपनगरांत वाढलेल्या कचऱ्याचे ढिग, त्यामुळे पसरणारा दुर्गंध, अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अनेक दिवसांचे बंद अवस्थेतील पथदिवे, सार्वजनिक स्वच्छता ठिकाणे, शौचालय, बंद अवस्थेतील घंटागाडी आदी मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नसून नागरिकांचे या सुविधांअभावी प्रचंड हाल होत आहेत. परंतु याकडे नगरपरिषद प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासक नगरपरिषदमध्ये हजर राहत नसल्याने अनेक समस्या उद्भवल्याने त्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार असून त्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद येथे येण्यासाठी आग्रही भूमिका घेत आंदोलन सुरू केले. यावेळी नगरपरिषदेमधील संपूर्ण कामकाज बंद ठेवून नगरपरिषदेस टाळे लावण्यात आले.

यावेळी प्रदीप अहिरे, सुनील कदम, प्रकाश महाले, प्रशांत पगार, नितीन काळे, प्रकाश कडाळे, आशिष शिंदे, कामेश शिंदे, नितीन जाधव, आंनद खैरे, संजय कुऱ्हाडे, दिपक सोनार, ताराबाई वाघले, धर्मेंद्र जाधव, संजय पगार, संतोष कदम, सुरज शेलार, सागर शिंदे, गुणेंद्र तांबट, महेश शेजवळ, दीपक कदम, राहुल आहिरे, अन्सार कुरेशी, शरीफ खाटीक, असलम शेख, शब्बीर खाटीक, अनिल सोमासे, ओंकार शिंदे, सुनील चौधरी, प्रणित कदम, सुमित शिरसाठ, आकाश भवर, मोसीन पठाण, दयानंद अहिरे, अमित कोळपकर आदी उपस्थित होते.

ओझर शहर व उपनगरांची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती दयनीय झाली असून अनियमित पाणीपुरवठा याने महिलांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. या सर्व कचाट्यातून ओझरकरांची प्रशासनाने लवकरात लवकर मुक्तता करावी अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- नितीन काळे, शिवसेना शहरप्रमुख, ओझर.
 

Web Title: Avoid Ozar's problems with the city council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.