गर्दी टाळा, कोरोनाचे वाहक बनू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 08:53 PM2020-03-23T20:53:53+5:302020-03-24T00:19:01+5:30
नाशिक : कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शासनाकडून दि. २२ मार्च रोजी ‘पब्लिक कर्फ्यू’ जाहीर केला तरी आज बरेचसे नागरिक बाहेर होते. सूचनांचे पालन करीत नाहीत. ‘मला काही होत नाही, मला काही झालं नाही’, असे न म्हणता गर्दीत जाणे टाळा आणि कोरोनाचे वाहक बनू नका असे कळकळीचे आवाहन मूळच्या निफाड तालुक्यातील व सध्या इटलीस्थित अभिषेक डेरले या युवकाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अभिषेक हा निफाड येथील रहिवाशी असून, सध्या तो इटलीतील तुरीन प्रांतात स्थायिक झालेला आहे. तेथे तो ‘मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी’ या विषयावर पीएच.डी. करीत आहे. इटलीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला असून, सद्यस्थिती त्याने जवळून अनुभवलेली आहे. कोरोनाची पाळेमुळे हळूहळू सर्वत्र पसरत असून, त्याची झळ भारतालाही बसू लागली आहे. सध्या भारत कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर असल्याने अभिषेकने सोशल मीडियाच्या माध्यमावर एक व्हिडीओ बनवून चिंता व्यक्त केली आहे.
भारतातील जनतेने केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक सूचनेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, गर्दीत जाणे टाळायला हवे. कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत असल्यास समोरच्या व्यक्तीपासून सहा ते सात फुटाचे अंतर राखावे आणि आपले हात खिशातच ठेवावेत. कारण व्हायरसचा प्रसार करण्यात हात हेच प्रसारमाध्यम असल्याचे सांगून प्रत्येकाने काळजी घ्यावी,असे आवाहन अभिषेक डेरले याने केले आहे.मागील काही आठवड्यांपासून मी इटलीमधील कोरोना व्हायरसची स्थिती बघत आलो आहे. इटलीमधील केसेस दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याचे मूळ कारण म्हणजे जनतेने केलेला निष्काळजीपणा. कोरोना व्हायरस स्टेज वन आणि स्टेज टूमध्ये असताना इटालियन सरकारने जनतेला गर्दीमध्ये जाणे टाळा अशा बºयाच सूचना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्याचे दुष्परिणाम पहावयास मिळत आहेत. इटलीप्रमाणे भारत आज स्टेज टू असून, जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करून गर्दीत जाणे टाळले पाहिजे.
- अभिषेक डेरले, तुरीन, इटली